- निखिल म्हात्रेअलिबाग - रु ग्णांची काळजी घेणारी यंत्रणा सतर्कआहे. या सतर्क यंत्रणेत अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमधील यंत्रणा अपवाद ठरली आहे. अलिबागमधील कोविड विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित आणि संशियत व्यक्तींवरील उपचारात आणि इतर सुविधांची वाणवा आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालयातील कोविड विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केलेल्या एका तरु णाने दिली.अलिबाग तालुक्यातील रामराज नजीकच्या गावात राहणार हा तरु ण आजारी होता. त्याला ताप येत होता. यामुळे त्याने थेट उपचारासाठी अलिबाग रु ग्णालय गाठले. तो तरु ण रु ग्णालयात उपचारासाठी आला तेंव्हा काहीच व्यवस्था नाही म्हणून त्याने पुन्हा आपले घर गाठले. दोन दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याने पुन्हा अलिबाग जिल्हा सामान्य रु ग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी मात्र त्या तरु णाला जिल्हा सामान्य रु ग्णालयातील कोविडच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. अद्याप या तरु णाचा स्वॅबचा तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. असे असताना देखील त्या तरु णाला कोरोनाबाधितांच्या कक्षात दाखल करण्यात आले. एवढ्यावर न थांबता आरोग्य यंत्रणेने त्या तरु णाला जेवणाची देखील व्यवस्था केली नाही. या कोविड विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल असणाऱ्या रु ग्णांसाठी असलेले स्वच्छता गृह देखील अस्वच्छ आहे. कोरोनाबाधित आणि संशियत व्यक्तींना गरम पाणी देण्यासंदर्भांत दुर्लक्ष केले जात आहे. असे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तरु णाने सांगितले.जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या विलगीकरण कक्षाकडे आरोग्य यंत्रणेचे रु ग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. या विलगीकरण कक्षात पीपीटी किट परिधान करून डॉक्टर आणि परिचारिकांनी तैनात असणे गरजेचे आहे असे असताना डॉक्टर आणि परिचारिका या विलगीकरण कक्षाच्या बाहेर उभ्या राहून बंद केलेल्या दरवाजाच्या बाहेरून रु ग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवीत आहेत. या विलगीकरण कक्षात या रु ग्णांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे.कोरोनाची बाधा झालेल्या रु ग्णांना बरे करण्यासाठी घ्यावयाची काळजी घेताना दिसत नाही. या विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच आपले काय होईल, या कल्पनेने टाहो फोडीत आहेत. या बाधितांबरोबर कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असतानाही आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करताना दिसत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यास सोशल डिस्टन्सिंग आणि उपाययोजनांचा अभाव असे भयावह चित्र आहे. असे असताना कोरोनाबाधित व्यक्तीची काळजी घेणारे डॉक्टर आणि परिचारिका रु ग्णांकडे दुर्लक्ष करीत आहेत. पीपीई किट परिधान करून या यंत्रणेला रु ग्णांची तपासणी करण्यासाठी विलगीकरण कक्षात पाठविले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये एका तरु णाला त्याचा आरोग्य तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला नसतानाही दाखल करणे आणि त्याचबरोबर त्याच्या नातेवाइकांची चौकशी न करणे, यामुळे आरोग्य यंत्रणेवर संशयाचे वलय फिरले आहे. कोरोनाबाधितांच्या उपचार आणि सुविधा पुरविण्याबाबत आरोग्य विभाग हेळसांड करीत आहे.- अॅड. महेश मोहीते, भाजप जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड
coronavirus: अलिबागमधील विलगीकरण कक्षात सुविधांची वानवा, संशयित रु ग्णांची हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:05 AM