रायगड : काेराेनाच्या वाढत्या प्रभावापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. सरकारने तर राज्यात मिनी लाॅकडाऊन लावले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहारांवर बंधने आली आहेत. हाॅटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. हाॅटेल इंडस्ट्री आर्थिक अडचणीत आली असतानाच त्या ठिकाणी चपाती आणि भाकरी पुरविणाऱ्या महिलांवरदेखील उमासमारीची वेळ आली आहे. काेराेनाचा कहर सातत्याने वाढत आहे. जगाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य चाैथ्या स्थानावर आहे. त्यामुळे काेराेनाला राेखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लाॅकडाऊन लावले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामध्ये हाॅटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. नऊ महिन्यांपासून ठप्प असणाऱ्या हाॅटेल व्यवसायाला गती येत असतानाच आता पुन्हा लाॅकडाऊनमुळे हाॅटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडणार आहेत. त्याचप्रमाणे येथील विविध हाॅटेलमध्ये स्थानिक महिला चपाती आणि भाकरी पुरवितात. आता हाॅटेल व्यवसाय बंद राहणार असल्याने त्यांच्या व्यवसायावरही संक्रांत आली आहे.वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक चपाती, भाकरी हाॅटेलसाठी पुरविल्याने आम्हाला चार पैसे मिळायचे. सर्व सुरळीत सुरू हाेते. मात्र, २०२० साली आलेल्या काेराेना महामारीमुळे हाॅटेल व्यवसाय बंद हाेता. त्यामुळे आमचेही व्यवसाय बंद झाले.तब्बल नऊ महिन्यांनंतर पुन्हा व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच पुन्हा काेराेनाचे संकट वाढले आहे. आता पुन्हा हाॅटेल बंद करण्याचे आदेश सरकारने दिले.गेले वर्षभर काम नसल्याने आम्ही कसे दिवस काढले आमचे आम्हालाच माहिती आहे. आता पुन्हा लाॅकडाऊन केल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे हाॅटेल व्यवसाय बंद करावे लागले आहेत. त्याचा विपरीत परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आहे. काेराेनामुळे नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. हाॅटेलमध्ये गर्दी होणार नाही. त्यामुळे आमच्याकडून भाकऱ्या काेण घेणार. आमच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.- गुलाब म्हात्रेहाॅटेलमध्ये चपाती, भाकरी देण्याचे काम आम्ही करताे. त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. आता मात्र सरकारने हाॅटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपाेआपच आमच्याही व्यवसायवर संक्रांत आली आहे.- जयश्री भगतकाेराेना यावर्षीसुद्धा पाठ साेडायला तयार नाही. गेले वर्षभर आर्थिक अडचणीचे हाेते. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.- नीता म्हात्रे
CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने महिलांची चपाती-भाकरी हिरावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 12:35 AM