CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:11 AM2021-04-08T00:11:09+5:302021-04-08T00:11:24+5:30

व्यापारी वर्गाने मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे.

CoronaVirus Lockdown News: Traders oppose mini lockdown | CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

Next

अलिबाग : आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. सरकारने मिनी लॉकडाऊनचे गाजर दाखवून व्यापारी वर्गाची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्ह्यातील व्यापारी करीत आहेत. व्यापारी वर्गाने मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे.

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार, ३० एप्रिलपर्यंत काही निर्बंध लावण्यात आले असून, मिनी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता, इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची मंगळवारपासून कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली. रायगड व परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली आहेत आणि जो व्यावसायिक नियम पाळणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मिनी लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाभरातील दुकाने पोलिसांनी बंद केली. ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, व्यावसायिकांना त्यांनी आवाहन केले, अन्यथा कारवाईचा इशारा दिला. एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने, आर्थिक नुकसानीला व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. 

Web Title: CoronaVirus Lockdown News: Traders oppose mini lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.