coronavirus: रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:32 AM2020-07-25T11:32:52+5:302020-07-25T11:34:00+5:30
यापुढे मिशन बिगीन -2अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागु राहणार आहेत,असेही आदेशात म्हटले आहे,
रायगड - शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून रायगडातील लॉकडाऊन उठण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्ण वाढण्यात घट होत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद केले आहे. परंतु यापुढे मिशन बिगीन -2अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागु राहणार आहेत,असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे,
जिल्ह्यात 15 जुलैपासून लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या लॉकाडाऊनला काही नागरीकांनी विरोध केेला होता. या कालावधी दोन वेळा थोडी शिथीलता देत लॉकडाऊन सुरु ठेवले होते. मात्र शेवटी दोन दिवस आधीच त्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शुक्रवार (दि.24 जुलै) पासून रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत,