CoronaVirus : शेकापचे आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण; काहीच दिवसांपूर्वी घेतली होती लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:17 PM2021-03-29T18:17:03+5:302021-03-29T18:22:28+5:30

MLA Jayant Patil infected with corona : कोरोना झाल्याबाबत आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

CoronaVirus: MLA Jayant Patil infected with corona; The vaccine was taken a few days ago | CoronaVirus : शेकापचे आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण; काहीच दिवसांपूर्वी घेतली होती लस

CoronaVirus : शेकापचे आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण; काहीच दिवसांपूर्वी घेतली होती लस

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसिद्ध गायक महेश काळे यांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाबतची विशेष काळजी घेतल्याचेही ते सांगायाला विसरले नाहीत.

रायगड : शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे कोरोनाची लस प्रभावी आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (CoronaVirus: MLA Jayant Patil infected with corona; The vaccine was taken a few days ago)

कोरोना झाल्याबाबत आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी आणि प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. 

'...तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा', मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश 

प्रसिद्ध गायक महेश काळे यांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाबतची विशेष काळजी घेतल्याचेही ते सांगायाला विसरले नाहीत. लस घेतल्यानंतरही कोरोना होत असेल तर खरच सदरची लस प्रभावी आहे का असा प्रश्न पडतो. 

दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची लस घेतल्यानंतर अॅण्टी बॉडीज तयार होण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. या कालावधीत काळजी घेतली नाही तर कोरोना होऊ शकतो. नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर स्पष्ट करतात. 

...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून निर्वाणीचा इशारा 

Web Title: CoronaVirus: MLA Jayant Patil infected with corona; The vaccine was taken a few days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.