coronavirus: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, दुसऱ्या टप्प्यातील काम ७० टक्के पूर्णत्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:31 AM2020-10-31T00:31:17+5:302020-10-31T00:33:14+5:30
Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यापर्यंत ७ लाख ९६ हजार २२ कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आली. यामध्ये ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणोकडे ठेवली आहे
- निखिल म्हात्रे
अलिबाग - कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी 'माझ कुटुंब, माझी जबाबदारी' ही व्यापक प्रचार मोहीम हाती घेत, जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यापर्यंत ७ लाख ९६ हजार २२ कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आली. यामध्ये ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणोकडे ठेवली आहे, तर मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. राज्य सरकारने १५ सप्टेंबरपासून ''माझ कुटुंब, माझी जबाबदारी'' व्यापक प्रचार मोहीम सुरू केली.
स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरिकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावामध्ये जाऊन माहिती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर प्राथमिक उपचार करत आहेत.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
कोरोना एकही रुग्ण नाही
कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही नोंद पथकाद्वारे ठेवण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेतून कोरोनाचा रुग्ण मिळून आला नाही.
१,१४९ पथके तैनात
''माझ कुटुंब, माझी जबाबदारी'' मोहीम सुरू झाली असून, या मोहिमेत १,१४९ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी दिवसभरात ७३,६३७ कुटुंबांची तपासणी केली.
घरोघरी जाऊन तपासणी
माझ्या घरी अचानक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी आले होते. आलेल्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असल्याची रेश्मा रफीक सय्यद यांनी सांगितले.