CoronaVirus News : कर्जतमध्ये पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:48 PM2020-09-16T23:48:10+5:302020-09-16T23:48:39+5:30
कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
कर्जत : तालुक्यातील कोरोना हटण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस तो ग्रामीण भागासह शहरी भागातही पसरत आहे. बुधवारी एका पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आजपर्यंत तालुक्यात १,३३५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, १,०५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या २४ वर्षीय पत्नीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुद्रे खुर्दमधील स्वप्ननगरीमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेला, नानामास्तरनगरमधील ३५ वर्षीय युवकाला, मुद्रे खुर्द गावातील ४७ वर्षीय व्यक्तीला, कर्जत शहरातील ५९ वर्षीय व ५० वर्षीय व्यक्तींना, ३१ वर्षीय दोन युवकांना, ४ वर्षांच्या बालकाला, ५० व ३२ वर्षांच्या महिलांना, १६ वर्षांच्या मुलीला, २ वर्षांच्या बालिकेला, भिसेगावमधील २३ वर्षीय युवतीला, दहिवली येथील २८ वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे.
मोठे वेणगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा, नेरळमधील ८४ वर्षांच्या व्यक्तीचा, शेलू येथील ३२ वर्षीय महिलेचा, माथेरानमधील ४७ वर्षीय महिलेचा, ५६ वर्षीय व्यक्तीचा, ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
महेंद्र थोरवे कोरोनाबाधित
कर्जतचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा कोरोना टेस्टचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. 'माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही.' माझ्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची टेस्ट करून ती पॉझिटिव्ह आल्यास वेळीच उपचार करून घ्यावेत असे थोरवे यांनी स्पष्ट केले आहे.