रायगड : जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे तब्बल तीन लाख ७६ हजार २२२ विद्यार्थी थेट पास झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेराेना पावला असे बाेलले जात आहे. मात्र शाळांमध्ये परीक्षाच हाेणार नसल्याने पालक शाळांमध्ये फी भरणार नाहीत. त्यामुळे काही शाळा या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यामध्ये वेगळी परिस्थिती नसल्याने काेराेना संसर्गाचा धाेका अधिक वाढला आहे. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सुरुवातीला सरकारने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवली हाेती. त्यानंतर पुन्हा सुरू केली हाेती, मात्र आता सरकारने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, पालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७६ हजार ९३३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे. मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षाच झाली नसल्याने मुलांना पास करण्याचा निर्णय मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा हा अंतिम उपाय नाही.- संजीव नाईक, पालकसरकारने निर्णय घेतला आहे म्हणजे सर्व बाजू तपासूनच घेतला असणार. आधी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता आल्या नाहीत. आता सर्वच मुले पास असा निर्णय घेण्याची सरकारवर पुन्हा वेळ येऊ नये असे वाटते.- अविनाश पाटील, पालकसरकारने सरसकट मुलांना पास करण्याचा निर्णय घेणे हास्यास्पद आहे. ऑफलाइन परीक्षा घेता येत नसेल तर किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे गरजेचे हाेते. परीक्षाच हाेणार नसेल, तर पालक शाळेमध्ये फी भरणारच नाहीत. त्यामुळे कायम विनाअनुदानीत शाळा आर्थिक अडचणीत सापडतील आणि हे अत्यंत धाेकादायक आहे.- अमर वार्डे, शिक्षणतज्ज्ञसर्वांनाच पास करण्याचा निर्णय घेताना सरकारला आनंद झाला असेल असे मला वाटत नाही. काेराेनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या मनावरही निश्चित परिणाम झाला आहे.- दयानंद गावडे, पालकपरीक्षा न देताच मुले पास हाेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा पायाच कमकुवत करण्यासारखे आहे. परंतु काेराेनाच्या महामारीच्या संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. त्याला सरकार तरी काय करणार?- हाफीज गाेंडेकर, पालक
CoronaVirus News: काेराेना विद्यार्थ्यांना पावला, शाळांना काेपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:24 AM