CoronaVirus News : कोरोनाचा रुग्ण स्वत:च गाडी चालवत दवाखान्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:27 AM2020-07-17T07:27:52+5:302020-07-17T07:28:09+5:30

दोन नातेवाईक दुस-या गाडीतून मनोज यांच्यापाठोपाठ कामोठे येथील हॉस्पिटलमध्ये गेले.

CoronaVirus News: Corona's patient admitted to hospital driving himself | CoronaVirus News : कोरोनाचा रुग्ण स्वत:च गाडी चालवत दवाखान्यात दाखल

CoronaVirus News : कोरोनाचा रुग्ण स्वत:च गाडी चालवत दवाखान्यात दाखल

googlenewsNext

वावोशी : परप्रांतीयांना गावी पाठविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणाऱ्या प्रशासनाने स्थानिकांना मात्र वाºयावर सोङले असून रुग्णवाहिका नसल्याने अत्यवस्थ कोरोना रुग्णाला स्वत: गाडी चालवत रुग्णालय गाठण्याची वेळ आल्याने प्रचंड चीड व्यक्त होत आहे.
नडोदे गावात राहणारे ३२ वर्षीय मनोज विचारे यांचा ९ जुलै रोजी, तसेच कुटुंबातील तिघांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचे समजले. मनोज यांनी ग्रामसेवकामार्फत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती दिली. दरम्यान, चार तास उलटूनसुद्धा आरोग्य यंत्रणेचे कोणी फिरकले नाही. मनोज विचारे यांनी खासगी रुग्णालयाशी संपर्क साधत बेडची व्यवस्था केली आणि आरोग्य पथकाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध होणार नाही असे उत्तर मिळाले. अर्धा- पाऊण तास वाट पाहिल्यानंतर मनोज यांची आॅक्सिजन पातळी घटत असल्याने त्यांनी स्वत:ची कार घेवून रुग्णालय गाठले.

नागरिकांत संताप
- दोन नातेवाईक दुसºया गाडीतून मनोज यांच्यापाठोपाठ कामोठे येथील हॉस्पिटलमध्ये गेले. सुदैवाने रुग्णालयात वेळेवर पोहोचल्याने उपचार मिळून मनोज विचारे घरी परतले असून कोरोना महामारीत शासन फक्त लॉकडाऊन घोषित करते आहे. परंतु पुरेशा सुविधा देत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona's patient admitted to hospital driving himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.