CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:10 AM2020-08-14T00:10:46+5:302020-08-14T00:10:55+5:30

स्थानिक पातळीवर घेतली जातेय खबरदारी; उद्योगांची संख्या आणि महानगरचा शेजार ठरतोय धोकादायक

CoronaVirus News: Fighting Corona by keeping the society awake | CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

Next

- आविष्कार देसाई 

रायगड : हा उद्योगांचा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे महानगराला लागून असल्याने या ठिकाणी कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची खबरदारी स्थानिक पातळीवर समाजमन जागृत ठेवून घेण्यात येत आहे.

उद्योगधंद्यांचे जाळे ज्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आहे तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असे समीकरण मांडण्यात येते. मात्र उद्योग आणि महानगराचा शेजार कधीकधी घातक ठरू शकतो हे अलीकडेच कोरोना प्रादुर्भावाच्या संख्येवरून दिसून येते. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे हे अगदी लगतचे जिल्हे आहेत. सुरुवातीपासूनच या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आला आहे. त्याचा विपरीत परिणाम हा रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढण्यावर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये उरण, तळोजा, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या औद्योगिक पट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. कारखान्यांतील कामगार, अधिकारी हे कोरोनाची शिकार झाल्याने स्थानिक पातळीवरील गावांमध्ये कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

कोरोनामुळे आज माणसाने माणूसपण हरवले आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये समाजमन जागे ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी पावले टाकली आहेत. गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

सॅनिटायझरचा वापर, नाका-तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करणे, त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करणे, त्याचप्रपाणे क्वारंटाइन केलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे, गावांमध्ये स्वच्छता ठेवणे, शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे वाटप करणे असे विविध उपाय करण्यात येत आहेत. गावकऱ्यांना गावाबाहेर जायचे असेल तर ते मास्क आणि सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत आहेत.

नेमके काय केले?
कोरोनाला रोखण्यासाठी गावांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे.
दुकानामध्ये अथवा बोलताना सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. नागरिक हि याबाबत सजग झाले आहेत.
गावात नव्याने येणाºयांची नोंद ठेवून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. नियम पाळले जात आहेत.
क्वारंटाइन करण्यासाठी समाज मंदिर, शाळेच्या इमारतींत राहण्याची व्यवस्था करणे.
क्वारंटाइन कालावधीमध्ये कोणी बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे, जेवणाची औषधांची व्यवस्था करणे.
क्वारंटाइन केलेल्यांच्या घरातील वयोवृद्ध, लहान मुले, महिला, गरोदर माता यांची काळजी घेणे.
गावामध्ये सण, उत्सव साजरे न करण्यासाठी दवंडी देण्यात येत आहे.
नागरिकांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप करणे.
प्रशासनाकडून कोरोनाबाबत येणाºया सूचना, आदेशांचे काटेकोर पालन के ले जात आहे.
कोरोनामुळे समाजातील नागरिकांचे तंटे होऊ नयेत याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.

अडीच लाख नागरिक परतले
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी-बियाणे, अवजारे यांची खरेदी करताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नागरिक आले होते. मुंबई-पुणे येथे काम-धंद्यानिमित्त हे नागरिक तेथे राहतात.

कोरोना रोखण्यासाठी जनजागृती
कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण पातळीवर जनजागृती के ली जातआहे. कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सरकारकडून आलेले निर्देश, सूचना यांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्क्रीनिंग करण्यात येत आहे.
- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड

भीती दूर के ली
स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सॅनिटायझर, मास्कचा वापर, कोरोनाबाबतचे समज-गैरसमज याबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली. कोरोनासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे.
- सरिता भगत, सरपंच, वाडगाव

स्वच्छतेवर दिला भर
कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक अंतर राखणे यावर भर दिला. बाहेरून येणाºयांची तपासणी करण्यात येते. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
- संजय पाटील, सरपंच, बेलकडे

ग्रामस्थांचे सहकार्य
ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना मास्क लावण्यास सांगून कोणताही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देतो. माझे सर्व सहकारी व ग्रामस्थ मला सहकार्य करतात.
- सुरेश फराट, सरपंच, वरई तर्फे निड ग्रुप ग्रामपंचायत-कर्जत

निर्जंतुकीकरणावर भर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत गावातून फलक लावले. चौकातून दवंडी देण्यात आली.
- चंद्रकांत चाळके, सरपंच, शिस्ते

मास्कची सक्ती
बोर्लीपंचतन ग्रामपंचायत हद्दीत कॉर्नर बैठका, दवंडी आणि फलक लावून नागरिकांत जनजागृती करण्यात आली. मास्क वापरावर सक्ती करून, नागरिकांना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यास सांगत आहोत.
- उत्तम दिवेकर, उपसरपंच

प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका
कोरोनाची दहशत प्रचंड असल्याने खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यास नकार देत होते. त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उभे होते. एखादा कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर उपचार करण्यात येतात.

अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल
ग्रामीण भागामध्ये खºया अर्थाने सुदृढ आरोग्याची जबाबदारी ही अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर्स यांच्यावरच आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, औषधांचे वाटप करणे ही कामे करतानाच, शालेय पोषण आहाराचे वाटप करणे, गरोदर मातांचे संगोपन करणे अशी कामेही करत आहेत.

Web Title: CoronaVirus News: Fighting Corona by keeping the society awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.