शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

CoronaVirus News: उरणमधील शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:44 AM

कोरोना रुग्णांची संख्या वाढली, उपचारासाठी अक्षम्य टाळाटाळ

- मधुकर ठाकूरउरण :  नागरिकांची बेपर्वाई, सण, समारंभात शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून होणारी गर्दी आणि कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही फक्त भीतीमुळे रुग्णांकडून उपचारासाठी होत असलेली अक्षम्य टाळाटाळ, यामुळे उरणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्णांना बेडही उपलब्ध राहिलेले नाहीत. कोरोनाच्या उसळीमुळे मात्र उरणमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत आणि जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वाढतच चालला आहे. त्याला उरण तालुकाही अपवाद राहिलेला नाही. घरामध्ये अडकून पडलेले नागरिक नुकतेच बाहेर पडू लागले आहेत. मात्र, बाहेर पडताना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले निर्देश पाळले जात नाहीत. यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. उरण तालुक्यामध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळेस नाक्या नाक्यावर, बाजारात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. उरणमध्ये कुणालाच कोरोना विषाणूची भीती नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्यामुळे रुग्ण संख्येत भर पडत चालली आहे.यामध्ये नोकरदार वर्ग आणि परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. उरण शहराचा भाग असणाऱ्या चारफाटा या ठिकाणी दररोज सकाळी शेकडो परप्रांतीय मजूर रोजंदारीसाठी गर्दी करून असतात. यावेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर केला जात नाही. तर येथील रिक्षा आणि खासगी वाहतूक सेवादेखील कोणतेही नियम पाळत नसून, क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक करून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यातच कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही केवळ गैरसमज आणि भीतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. कोरोनाची टेस्ट करून घेण्यासही धजावत नाहीत. असे संशयित रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी कोरोना स्पेडर बॉम्ब ठरू लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणा प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम करीत नाहीत.वाढत्या रुग्णांमुळे आज सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध राहिलेले नाहीत. ही बाब उरणकरांसाठी निश्चितपणे चिंताजनक आहे. यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रविवारी जीटीपीएस कॉलनी येथे जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता पकंज नागदेवता यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात आली. शहर अथवा ग्रामीण भागात कोरोनासदृश कोणतेही लक्षणे कोणत्याही व्यक्तीला जाणवली तर अशा व्यक्तीने तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.    - संतोष पवार, कोरोना समन्वयक उरण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या