शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

CoronaVirus News: यंदा गोविंदांचा ढाक्कुमाकुम नाहीच...; कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:14 AM

मंदिरातही शुकशुकाट; नियमांचे काटेकोर पालन

‘शोर मच गया शोर देखो, आया माखन चोर’, ‘एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरे हुश्शार’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी स्पीकरवर वाजणारी एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीते आणि डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, काळजात धडकी भरायला लावणारे गोविदांचे थर या वर्षी कोरोना विषाणूच्या सावटामुळे पाहायला मिळाले नाहीत. चार ते पाच माणसे एकत्र येऊन घरच्या घरी दहीहंडी फोडली गेली.अलिबाग : मंगळवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठही झाले नाहीत. मंदिरातील पुजाºयाने फक्त पूजा करून देऊळ पुन्हा बंद केले होते, तर प्रत्येकाने प्रसाद म्हणून सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. कोकणामध्ये दहीहंडी उत्सवामध्ये सोंग काढण्याची परंपरा बºयाच वर्षांपासून सुरू आहे. अलिबाग कोळीवाडा परिसरातून आजही पौराणिक, ऐतिहासिक, तसेच सद्य:स्थितीवर भाष्य करणारी सोंगे काढली जायची. मात्र, या वर्षी गोपाळकाला उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने, अनेक वर्षांची परंपरा थांबली होती.रायगड जिल्ह्यात नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी दहीहंडी रद्द करावी, अशी ग्रामपंचायतींच्या वतीने गावागावात दवंडी पिटविण्यात आली होती. याला गावकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील ७०० हून अधिक दहीहंडी रद्द झाल्या होत्या, तसेच गोपाळकालाच्या दिवशी निघणाºया मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वर्षीच्या गोपाळकाला सण आगदी साधेपणात साजरा झाला, तर दुसरीकडे गावागावातील तलावांमध्ये पोहण्यासाठी गोविंदांची गर्दी असायची. मात्र, या वर्षी गावातील तलाव विहिरींवरही भयाण शांतता अनुभवयास मिळाली.नियमांचे काटेकोर पालनकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात संचारबंदीचे पालन होण्यासाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ काला उत्सव शांततेत पार पडण्यासाठी ११ पोलीस अधिकारी, १८० पोलीस कर्मचारी, २५५ होमगार्ड, तर ३ आर.सी. प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत, तसेच नागरिकांनी अगदी शांततेत उत्सव साजरा करावा, असे अवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे नागरिकांनी तंतोतंत पालन केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDahi Handiदहीहंडी