दिघी : श्रीवर्धन तालुक्यामध्ये मागील दोन आठवडे रुग्णांमध्ये वाढ होत असताना, मंगळवार १३ एप्रिल रोजी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यात ११ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये बोर्लीपंचतन २, वरशेत वावे ३, भट्टीचा माळ १, सायगाव १, श्रीवर्धन शहर २, करलास १ आणि हरवीत येथील एका रुग्णाचा समावेश आहे. १३ एप्रिल रोजी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यात ११ रुग्ण संख्या वाढली असून, आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५५ झाली आहे. यातील २३ रुग्ण दगावले आहेत, तर ४७३ रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. सध्या ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. या महिन्यामध्ये कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
लसीकरणासाठी आवाहनबोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडून नागरिकांना करण्यात येत आहे. रुग्णालयात लसीकरण सेवा सुरळीत मिळत असून, दररोज रुग्णालयांत लसीकरणाचा वेग वाढून, ग्रामीण भागात लस घेण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत