आविष्कार देसाई अलिबाग : कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग आणि पोलीस हेच खऱ्या अर्थाने कोरोना फायटर ठरले आहेत. परंतु सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. यामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल ३०५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता प्रत्यक्षात कोरोना विरोधातील लढाईमध्ये राहणार नसल्याचे उघड झाले आहे.चोवीस तास रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आणि मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्याने राज्य सरकार सर्तक झाले आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मृत पावणाऱ्यांचे वय महत्वाचे ठरत आहे. ५५ वर्षाच्या पुढे आणि काही अजार असणाºयांना आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. पोलीस दलाला कोरोनाचा विळखा पडला तर राज्यात निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य सरकारने ५० वर्षा वरील पोलिसांना बाबत महतवपूर्ण निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यात २७० पोलीस कर्मचारी आणि ३५ पोलीस अधिकारी असे एकूण ३०५ पोलिसांचा समावेश आहे. २७० पोलिस कर्मचाºयांमध्ये ३६५ पुरुष आणि पाच महिला कर्मचाºयांनी वयाची ५० ओलांडली आहे, तर दोन पोलीस उपअधिक्षक, २२ पोलीस निरीक्षक आठ सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था नसल्याने उपलब्ध पोलिसांवरच ताण येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक झाले आहे.।राज्य सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामधये अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.- अनिल पारसकर,पोलीस अधिक्षक, रायगड
CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:30 AM