CoronaVirus News : रायगडमध्ये रुग्णसंख्या कमी, मात्र मृत्युदर अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:42 IST2020-10-31T23:42:10+5:302020-10-31T23:42:45+5:30
CoronaVirus News in Raigad : काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आराेग्य सोईसुविधा उभ्या करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत.

CoronaVirus News : रायगडमध्ये रुग्णसंख्या कमी, मात्र मृत्युदर अधिक
- आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यामध्ये सध्या काेराेनाच्या रुग्णसंख्येचा आलेख मंदावला आहे. मात्र, मृत्युदर हा राज्याच्या तुलनेत अधिक असल्यानेकाेराेनावरील लस येईपर्यंत विविध आजारांनीग्रस्त असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज
आहे.
काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आराेग्य सोईसुविधा उभ्या करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे, ''माझे कुटुंब, माझी जबाबदारी'' या माेहिमेमुळे नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे. सध्या काेराेना संसर्ग हाेण्याचे प्रमाण कमी हाेत आहे, तर दुसरीकडे मृत्युदरामध्ये घट हाेत नाही.
सरकार, प्रशासनाने वेळाेवेळी याेग्य निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे, कॅन्सर, मधुमेह, किडनीचे विकार, उच्च रक्तदाब अशा आजारांच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा मृत्यू हाेत आहे. अशा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ''माझे कुटुंब, माझी जबाबदारी'' माेहिमेमुळे जिल्हा प्रशासनाकडे सर्व प्रकारचा डेटा तयार आहे.
- डाॅ. सुहास माने,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड