शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

CoronaVirus News in Raigad : कोविड योद्धांच्या मदतीसाठी शिक्षक; रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार जणांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:01 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र कोरोनाशी युद्ध करत आहे. या योद्धांच्या मदतीसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभाग आता कोरोना विरुद्धच्या या लढ्यात सहभागी झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक असे सुमारे चार हजार जण कोरोना वॉरियर्सची भूमिका निभावत आहेत.जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाउन संपून आपण आपल्या घरी जाऊ शकू, या आशेवर असणाºया मुंबई व परिसरातील; परंतु मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेल्या चाकरमान्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. दुकाने, हॉटेल, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे कधी सुरू होतील, याबाबत निश्चितता नाही. जवळ असलेला पैसा संपत चाललेला आहे. यावर उपाय म्हणून ‘गड्या आपला गाव बरा’ या भावनेने मुंबई व उपनगरांमध्ये नोकरी-कामानिमित्त राहत असलेल्या या चाकरमान्यांची पावले आपल्या मूळ गावाकडे वळली आहेत.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारपाडा मार्गे प्रवेश करणाºया या नागरिकांची व्यवस्थितपणे नोंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या एकत्रित पुढाकारातून पेण तालुक्यातील खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.मुंबई, ठाणे येथून चालत येणाºया किंवा वाहनातून येणाºया प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी नोंद घेतली जात आहे. त्यांची थर्मल स्कॅनरने तपासणी करीत संबंधित नागरिक कुठून आले आहेत, कुठे चालले आहेत, त्यांचा वाहन क्र मांक, मोबाइल क्र मांक अशी सर्व माहिती नोंदवून घेतली जात आहे. तर नोंद होणाºया प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे.रायगडमध्ये येणाऱ्यांची होतेय नोंदशिक्षकांकडून नोंदविल्या जाणाºया माहितीमुळे जिल्हा प्रशासनाला दररोज रायगड जिल्ह्यात किती नागरिक नव्याने प्रवेश करीत आहेत याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या या नागरिकांच्या व्यवस्थापनाबाबत योग्य ते निर्णय घेणे, उपाययोजना राबविणे, यासाठी प्रशासनाला मोलाचे सहकार्य होत आहे. ग्रामीण स्तरावर ज्या कोरोना नियंत्रण समिती कार्यान्वित झाली असून, त्या समित्यांमध्ये हे शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.तीन शिफ्टमध्ये ड्युटीया मोहिमेसाठी या चेकपोस्टवर महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेसोबत आता प्राथमिक शिक्षकदेखील कोविड योद्धा म्हणून या लढाईत उतरले आहेत. खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी चेकपोस्टवर हे शिक्षक सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, दु. ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत, रात्री ११ ते स. ७ वाजेपर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये ड्युटी करणार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग