CoronaVirus News: शहरात कोरोनाची लक्षणे असलेले तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:59 PM2020-10-06T23:59:42+5:302020-10-06T23:59:50+5:30

२२,६०० नागरिकांची तपासणी; कर्जतमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना यशस्वी

CoronaVirus News: Three patients with corona symptoms in the city | CoronaVirus News: शहरात कोरोनाची लक्षणे असलेले तीन रुग्ण

CoronaVirus News: शहरात कोरोनाची लक्षणे असलेले तीन रुग्ण

Next

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना येथील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. शहरात राहणाऱ्या सर्व २२,६०० नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेमध्ये कर्जतकरांची आरोग्य तपासणी केली असता, केवळ तीन नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर एकही कोरोना झालेला रुग्ण या योजनेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असताना आढळून आला नाही.

कर्जत शहरात सरकारने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचे काम पालिकेने सर्व प्रभागात एकाच वेळी सुरू केले. त्यासाठी १२ टीम कर्जत शहर, तसेच दहिवली, भिसेगाव, गुंडगे, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द आणि आकुर्ले या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होत्या. त्यात १५ दिवसांत पालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व ६,४८७ घरी जाऊन या आरोग्य पथकाने तपासणी मोहीम राबविली. त्यात या योजनेच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजण्याचे काम, तसेच थर्मल स्कॅनिंग केले जात होते. १२ टीमकडून सर्वेक्षण सुरू असताना, पालिकेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी या प्रत्येक टीमला भेटून त्यांना कोणी नागरिक सर्वेक्षण करायला आडकाठी करीत असेल, तर त्यांची समजूत काढण्याचे काम जोशी स्वत: करीत होत्या. पालिकेचे सर्व १७ नगरसेवक-नगरसेविका आणि दोन स्वीकृत नगरसेवक हेही आरोग्य पथकाबरोबर राहून सर्वेक्षण करून घेण्यासाठी पुढाकार घेत होते.

१५ दिवसांनी पुन्हा मोहीम
कर्जत शहरात नागरिकांनी आरोग्य पथकाला केलेल्या सहकार्य, यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वी झाले आहे. पालिकेच्या हद्दीत राहणाºया सर्व २२,८०० नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे, परंतु आजही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर प्रवास करणारे नागरिक यांनी घराबाहेर पडताना, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. अशी सूचना पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केली आहे. आता पुन्हा १५ दिवसांनी आरोग्य पथक घरोघरी जाऊन पुन्हा एकदा नागरिकांची माहिती घेणार आहेत.

Web Title: CoronaVirus News: Three patients with corona symptoms in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.