coronavirus: कर्जत तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, १० दिवस दिली मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:53 AM2020-05-14T00:53:27+5:302020-05-14T00:53:33+5:30
पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली.
कर्जत : तालुक्यातील पिंपळोली येथे एका ४८ वर्षीय व्यक्तीचे ११ मे रोजी ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले. शरीरातील अन्य व्याधींवर १ मे पासून उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्या व्यक्तीचे रुग्णालयात निधन झाले. कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह चौथा रुग्ण असून वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असताना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या जवळच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे.
पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली. कोरोनाचा टेस्ट केल्यानंतर त्या रुग्णाला ७ मे रोजी कोरोना झाला असल्याचे निष्कर्ष निघाला. त्यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे ११ मे रोजी दुपारी निधन झाले. त्याानंतर नेरळ पोलीस ठाणे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पिंपळोली येथे पोहचले. येथील रुग्णाचे कुटुंबीय यांची माहिती घेण्याचे काम आरोग्य खात्याने सुरू केले. त्यांच्या टेस्ट घेऊन त्या पॉझिटिव्ह आल्या तर पिंपळोली गाव कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाऊ शकते. शासनाच्या नवीन आध्यादेशाप्रमाणे लगेच संबंधित रुग्णाचे गाव कंटेन्मेंट झोन करता येत नाही असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे पिंपळोली गाव सील करण्यात आले नाही. कोरोनामुळे रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सी. के. मोरे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील आदी पिंपळोली गावात पोहचले होते.
कर्जत तालुक्यातील चौथा कोरोना पॉझिटिव्ह
पिंपळोली येथील व्यक्तीचा ठाणे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. सर्वात आधी ठाणे येथून नेरळ येथून ये-जा करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता तर त्याच काळात मुंबईत वोकहार्ट रुग्णालयात नोकरी करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. ठाणे येथे टीसीएस कंपनीत दुचाकीवरून जाणारा कडाव जवळील एका गावातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता, या तिन्ही तरु णांनी कोरोनावर मात के ली.