वैभव गायकर
पनवेल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. त्यातच आशेचा किरण पनवेलकरांना दिसत आहे. परिसरात कोविड-१९ मधून मुक्त झालेल्यांनीही अर्धशतक गाठले आहे. पनवेलमधून ५० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडच्या रुग्णांची संख्या १३० आहे, तर ग्रामीण भागातील संख्या ४५ आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय, एमजीएम, कामोठे रुग्णालयात पनवेल परिसरात कोविडची बाधा झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णालयांना कोविड-१९चा दर्जा देण्यात आला आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना कोविडची लागण होत आहे. विशेषत: मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या यामध्ये मोठी आहे. कोविडवर उपचार सापडले नाही. मात्र, भारतात रुग्णांबरोबरच कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, ही चिंतेची बाब असली तरी कोरोनातून बरे होऊन घरी परतणाºयांची संख्याही वाढत आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास नक्कीच प्रशासनाला यश येईल. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका