- निखिल म्हात्रेअलिबाग : परप्रांतीयांना स्वगृही परतण्यासाठी लागणारी आॅनलाइन परवानगीसाठी अलिबाग पोलीस त्यांचे अर्ज दाखल करून घेत आहेत. तसेच पायी चालत निघालेल्या नागरिकांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना पिण्यासाठी पाणी व बिस्कीट देत आहेत. तसेच एखाद्या दमलेल्या व्यक्तीस लिफ्ट देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पोलीस करीत आहेत. आतापर्यंत ३५० कामगारांचे आॅनलाइन अर्ज पोलिसांनी भरून दिले आहेत.अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, आपल्या अशिक्षितपणामुळे अर्ज भरता येत नसल्याने काही कामगारांनी थेट अलिबाग पोलीसठाणे गाठले. पोलिसांना हकिगत सांगितली, त्यानंतर ३५० जणांचे आॅनलाइन अर्ज पोलिसांनी स्वत: भरून दिले आहेत. त्यामुळे परप्रांतीयांची ठिकठिकाणी होणारी गर्दी आता कमी झाली आहे.आपल्या मूळगावी परतण्यासाठी चाललेली धडपड, लाहन लेकरांना उचलून भरउन्हात आशेने हे कामगार रोज शहरात फिरत असत. त्यांची चालेली धडपड बंदोबस्त ड्युटीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. तोडकरी यांनी पाहिली. या कामगारांना होणारा त्रास समजून घेत बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या त्या दोन अधिकाऱ्यांनी कामगारांना आपण अर्ज भरून देण्यासाठी मदत करायची असे ठरविले. त्यानुसार रोज १० ते १२ जणांचे रोज भर्ज भरून देण्याचे काम हे स्वत: दोन अधिकारी करीत आहेत. येणाºया प्रत्येक कामगारास त्याची सध्याची परिस्थिती विचारीत त्याला आणखी कशा प्रकारे मदत करता येईल, यासाठी प्रयत्न करीत असतात. तसेच आपले मूळगाव गाठण्यासाठी पायी प्रवास करीत निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांनी पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी बिस्कीटही देत आहेत. कोरोना काळात कामाचा असलेला अधिक भार उचलत हे पोलीस मात्र आपली माणुसकी जपण्याचे काम करीत आहेत.शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न -कोल्हेपोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येक नागरिकास मदत करणे ध्येय आहे. सध्या नागरिकांना मदतीचा हात हवा आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून जेवढा मदतीचा हात पुढे करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.थकलेल्यांना प्रथम मदतीचा हात पुढे केल्याने काहींनी मदतीची पत्रही आम्हाला लिहिल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
coronavirus:परप्रांतीयांना स्वगृही जाण्यासाठी पोलिसांची मदत, ३५० कामगारांचे आॅनलाइन अर्ज भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 2:53 AM