- आविष्कार देसाईरायगड : सुरुवातीला कोरोना महामारीचे संकट, त्यापाठोपाठ आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अद्यापही सरकारची मदत पोहोचली नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक नुकसानीच्या खाईत लोटला गेला आहे. तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात सुरू आहे. त्याने आजही थांबण्याचे नाव घेतलेले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध अफवा पसरल्या गेल्याने, या कालावधीत सुरुवातीला खवय्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे व्यवसाय अडचणीत सापडला होता. त्यानंतर, सरकारने व्यवसायाची पाठराखण केल्याने व्यवसायाला सुगीचे दिवस आले. मात्र, जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील घर, विजेचे खांब, बागायतींचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे केले. त्यानंतर, सरकारने ३७४ कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. मदत वाटपाचे काम सुरू आहे. याच निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. जिल्ह्यात सुमारे २,२०० पोल्ट्री व्यावसायिक आहेत. वादळामुळे त्यांच्यातील बहुतांश पोल्ट्री उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही पोल्ट्रीतील पक्षांचा मृत्यू झाला आहे, तर काहींच्या पोल्ट्रीचे छप्परच उडाले आहेत. वादळामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, सुमारे १,८०० पोल्ट्री व्यावसायिक आहेत. पैकी ९०० पोल्ट्रीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार रेवदंडा आणि चौलमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यानुसार, एका पक्षामागे ५० रुपये असे १०० पक्षांसाठी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारी नियम आडवा येत असल्यानेच, पाचच हजार रुपये काही नुकसानग्रस्तांच्या हातावर पडले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे पाच कोटी रुपयांचेनुकसान झाले आहे. ९०० ठिकाणांचे पंचनामे करण्यात आले आहे. अद्याप काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सरकारकडे एकत्रित मागणी करण्यात येईल. त्यानंतरच नुकसानग्रस्तांना मदत देता येईल. - डॉ. सुभाष म्हसके, उपायुक्त पशुसंवर्धन, रायगडअलिबाग, पेण, रोहा श्रीवर्धन मदतीविनाअद्यापही अलिबाग, पेण, रोहा, श्रीवर्धनसह अन्य तालुक्यांमध्ये सुरुवातीचे पाच हजार रुपये पोहोच झालेले नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमच्या पोल्ट्रीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. सरकार, प्रशासनाकडून अद्याप आम्हाला मदत मिळालेली नाही. आधी कोरोनाचा कहर आणि आता वादळाचा फटका अशा दुहेरी संकटात सापडलो आहोत. सरकारने लवकरच मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रायगड पोल्ट्री फार्मर संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी के ली आहे.
coronavirus: पोल्ट्री व्यावसायिक मदतीच्या प्रतिक्षेत, 'निसर्ग'मुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:48 AM