Coronavirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनेत हलगर्जी नको, प्रमोद गवई यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:14 AM2020-03-20T04:14:38+5:302020-03-20T04:15:04+5:30

‘कोरोनो’ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आदेश प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद गवई यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

Coronavirus: Pramod Gawai orders, Preventive measures should not be taken lightly | Coronavirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनेत हलगर्जी नको, प्रमोद गवई यांचे आदेश

Coronavirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनेत हलगर्जी नको, प्रमोद गवई यांचे आदेश

googlenewsNext

अलिबाग : कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्य शासन अलर्ट झाले असून वरिष्ठ स्तरावरून जिल्हा आरोग्य यंत्रणेला वारंवार सूचना येत आहेत. या सूचनांचे पालन जिल्हा मुख्यालय ते गाव स्तरापर्यंतच्या सर्व यंत्रणांनी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ‘कोरोनो’ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आदेश प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद गवई यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील सर्व फार्मसिस्ट व आरोग्य यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या वेळी गवई बोलत होते. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्व यंत्रणांनी काटेकोर पालन करावे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. विदेशातून रायगडमध्ये आलेल्या ‘त्या’ नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’वर असून प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या जबाबदाºया गांभीर्याने पार पाडा, असे अवाहन डॉ. प्रमोद गवई यांनी केले आहे.

जिल्ह्यातील परिस्थितीबाबत दर दोन-तीन तासांनी आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या किंवा होणाºया नागरिकांना कॉरेनटाइन करण्यात येणार आहे. या वेळी शासनाकडून मिळालेल्या सूचनांबाबत उपस्थितांना अवगत केले. तसेच जिल्ह्यातील औषधसाठ्याचा आढावा घेत फार्मसिस्टना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयसोलेशन वॉर्डची पालकमंत्र्यांकडून पाहणी
रोहा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या १० खाटांच्या आयसोलेशनच्या वॉर्डची पाहणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली. या वेळी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरांकडून वॉर्डची माहिती त्यांनी जाणून घेतली.
प्रशासनाकडून कोरोनाच्या व्हायरसच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या खबरदारी व नियोजनाबाबत सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.
नागरिकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जागृती व्हावी, काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्या, कोरोनाला घाबरायचे नाही, त्याच्याशी लढू या, असे आवाहन या वेळी आदिती तटकरे यांनी नागरिकांना केले.

माथेरान येथील प्रवेशद्वारावर तपासणी
1माथेरान : नगर परिषदेच्या वतीने दस्तुरी नाका येथे येणाºया नागरिकांची कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी बी.जे. रुग्णालयातील वैद्यकीय पथक नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या आदेशानुसार ठेवण्यात आले आहे. येणारे नागरिक आपली तपासणी करून देत असून सहकार्य करीत आहेत. त्याबाबतची नोंद रजिस्टरला घेतली जात आहे. टेम्परेचर गन तपासणी यंत्राने दस्तुरी नाक्यावर खालून (नेरळ येथून) येणाºया नागरिकांची तपासणी केली जात आहे.
2३१ मार्चपर्यंत माथेरानमध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिक काही कामानिमित्त नेरळ अथवा बदलापूर, कल्याण, मुंबई येथे जाऊन येत असल्याने दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक नागरिकाची तपासणी झाल्यानंतर त्यांना हॅण्ड वॉश करून माथेरान शहरात पाठवण्यात येत आहे.
3हे तपासणी वैद्यकीय पथक गुरुवार १९ मार्चपासून कार्यरत झाले आहे. या वेळी नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत, वैद्यकीय अधिकारी उदय तांबे, परिचारिका स्नेहा गोळे, रत्नदीप प्रधान, कार्यालय अधीक्षक रंजित कांबळे आदी उपस्थित होते.
4आपल्या या छोट्याशा गावात सुंदर पर्यटनस्थळावर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दस्तुरी येथे आल्यावर सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि कार्यतत्पर मुख्याधिकारी बी.बी. भोई यांनी केले आहे.

घाबरू नका पण काळजी घ्या, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
- आदिती तटकरे, पालकमंत्री

मुरूड नगर परिषदेच्या वतीने जनजागृती मोहीम
आगरदांडा : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मुरूड नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद क्षेत्रात काय काळजी घ्यायची याबाबत माहितीपत्रक तसेच रिक्षावर स्पीकर लावून जनजागृती करण्यात येत आहे.
मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरात दोन हजार पत्रके व १० बॅनर लावून कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूबाबत जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी नागरिकांनी घाबरून न जाता यासंदर्भात सहकार्य करावे, साबणाने हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा, सर्दी किंवा फ्लुसदृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा, जास्त गर्दीच्या ठिकाणी, हॉटेल्स, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले. मुरूड नगर परिषदेच्या वतीने साफसफाई सुरू असून जंतुनाशके, धूर फवारणी करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी न घाबरता या कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूला पळवून लावा, असे आवाहन केले आहे. एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने कोरोना नाहीसा होवो याकरिता रोज श्रीरामकडे गाºहाणे मांडत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये तुटवडा असल्याने सरकारी रुग्णालयात नागरिकांकडून मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाडमधील बार, परमिट रूम बंद
महाड : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाड शहरातील बीअर बार आणि परमिट रूम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात येणार असल्याची माहिती महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी गुरु वारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महाड नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह आरोग्य सभापती सपना बुटाला, महिला व बालकल्याण सभापती हमिदा शेखनाग, पाणीपुरवठा सभापती मयूरी शेडगे उपस्थित होते.
महाड शहरात आयोजित करण्यात आलेले सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. हे कार्यक्रम घेतल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ३१ मार्चपर्यंत नागरिकांना नगरपालिकेत प्रत्यक्ष भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी ई-मेल कराव्यात. त्यांची तत्काळ दखल घेऊन, त्यांचे निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र या कालावधीत नागरिकांना नगरपालिकेत विविध करांचा भरणा करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट
केले.

उपाययोजना कराव्यात, रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णाबरोबर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, नागरिकांनी महाड शहरात येऊ, नये असे आवाहनदेखील नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी केले आहे. महाड शहरात ज्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाड नगरपालिकेकडून करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी या वेळेस दिली.

Web Title: Coronavirus: Pramod Gawai orders, Preventive measures should not be taken lightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.