CoronaVirus in Raigad : रायगड जिल्ह्यात 24 तासांत चार कोरोना रुग्णांचा मृत्यू; बाधितांचा आकडा दोनशे पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:12 PM2020-05-08T21:12:44+5:302020-05-08T21:55:44+5:30
CoronaVirus in Raigad: रायगड जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचा संसर्ग झालेले पनवेल महापालिकामध्ये आठ आणि ग्रामिणमध्ये सात, उरण आणि अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण 17 नवे रुग्ण आढळले आहेत.
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत असताना शुक्रवारी चार जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये चार पुरुष आणि एक महिला, तर उर्वरित ग्रामिणमध्ये तीन महिला अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचा संसर्ग झालेले पनवेल महापालिकामध्ये आठ आणि ग्रामिणमध्ये सात, उरण आणि अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण 17 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 207 वर जाऊन पोहोचला आहे. आतापर्यंत 60 रुग्णांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. त्यामध्ये पनवेल महापालिका 41, ग्रामीण विभागातील सात, उरण-4, श्रीवर्धन-4, कजर्त-2, पोलादपूर-1 आणि खालपूरमधील एकाचा समावेश आहे. सध्या 139 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, त्यामध्ये पनवेल महापालिका-92, पनवेल ग्रामीण-37, उरण-4, श्रीवर्धन-1, कजर्त-1, महाड-1 आणि अलिबागमधील तीन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना झालेल्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. परंतू आज चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कामोठे सेक्टर-34 येथील 54 वर्षीय महिला, कामोठे सेक्टर-11 मधील 7क् वर्षीय पुरुष, खांदा कॉलनी सेक्टर-7 मधील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील चारही रुग्ण ब्लड प्रेशर आणि लिव्हर संसर्ग अशा आजाराने ग्रस्त होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
त्याचप्रमाणो या आधी पनवेल महापालिका क्षेत्रत दोन पुरुष रुग्णांचा, पोलादपूर आणि महाड येथील प्रत्येकी एका महिला अशा चार जणांचा मृत्यू झाला होता. आज त्यामध्ये चार रुग्णांची भर पडल्याने हा आकडा आठ झाला आहे. दरम्यान, खबरादीचा उपाय म्हणून प्रशासनाने पनवेलला रेड झोनमध्ये टाकले आहे, तसेच त्या विभागासह उर्वरित रायगडमधील काही क्षेत्र हे कोरोना बाधित क्षेत्र घोषित केले आहेत.