Coronavirus: राजकीय उर्जा देणाऱ्या काेकणाला शिवसेनेने दिला "प्राणवायू" रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स      

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:59 PM2021-05-06T18:59:48+5:302021-05-06T19:02:12+5:30

Coronavirus in Konkan : रायगड जिल्ह्यामध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी शिवसेना मदतीला धावली आहे.

Coronavirus: Shiv Sena gives "oxygen" to Konkan, 150 oxygen concentrators for Raigad, Ratnagiri Sindhudurg | Coronavirus: राजकीय उर्जा देणाऱ्या काेकणाला शिवसेनेने दिला "प्राणवायू" रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स      

Coronavirus: राजकीय उर्जा देणाऱ्या काेकणाला शिवसेनेने दिला "प्राणवायू" रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स      

Next

रायगड ः जिल्ह्यामध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांना आॅक्सीजनची गरज भासत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी शिवसेना मदतीला धावली आहे. शिवसेनेच्यावतीने 150 ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत. त्‍यातील 50 ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर आज उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्‍याहस्‍ते  रायगड जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले.रायगड जिल्ह्याला  आॅक्सिजन काॅन्सेन्टर देण्यासाठी उच व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज सकाळी अलिबाग आणि महाड येथे दुपारी आले हाेते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Shiv Sena gives "oxygen" to Konkan, 150 oxygen concentrators for Raigad, Ratnagiri Sindhudurg)

शिवसेनेची पाळेमुळे हि खाेलवर काेकणाच्या मातीमध्ये रुजलेली आहेत. काेकणी माणसाने नेहमीच शिवसेना साध दिलेली आहे. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचे काेकण आणि काेणणातील माणसांवर विशेष प्रेम हाेते. प्रत्येक निवडणूकीत काेकणी माणूस हा शिवसेनेच्या हाकेला धावला आहे. आज या काेकणामध्ये काेराेनाच्या विषाणूने चांगलाच उच्छाद मांडला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आराेग्य व्यवस्थेचे हात ताेकडे पडत आहेत.

रुग्णाना आॅक्सीजनची गरज लागत आहे. त्यामुळे शिवसेनेने तिन्ही जिल्ह्यांसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सेन्टर देण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. त्यानुसार आज ते जिल्ह्याला वितरीत करण्यात आले. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्याकडे 50 आॅक्सिजन काॅन्सेन्टर सुपर्द केले. हे ऑक्‍सिजन कॉन्‍सेन्‍टर अलिबाग येथे 20 व महाड , कर्जत व खालापूर तालुक्‍यांसाठी प्रत्‍येकी 10 याप्रमाणे वितरीत केले जाणार आहेत. याशिवाय स्‍वदेस फाऊंडेशन या संस्‍थेतर्फे रायगड साठी 50 हजार मास्‍क व 5 मोबाईल व्‍हेंटीलेटर आज उदय सामंत यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले.बारावीच्या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना  कोविडची बाधा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. कोविडची लाट ओसरल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार अनावरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाचा बाटु असा नामोल्लेख करू नये यासाठी विद्यापिठाच्या रजिस्ट्रार यांना सूचना दिल्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडविणार असल्याचे त्यांनी सांगून आयएएस सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चाैधरी, आमदादर, भरत गोगावले ,एमएमएसीइटीपीचे अध्यक्ष संभाजी पठारे, महाड च्या प्रातधिकारी प्रतिभा पुलदवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.

 ऑक्सजीन कॉन्सेन्टर म्हणजे काय  
 ऑक्सजीन कॉन्सेन्टर एक वैद्यकीय डिव्हाइस आहे जे आसपासच्या हवेपासून एकाच वेळी ऑक्सिजन गोळा करतो. पर्यावरणीय हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो. अन्य गॅसचे प्रमाण हे एक टक्का आहे. आॅक्सिजन काॅन्सेन्टर वातावरणैातील हवा आत घेताे. त्यानंतर ती हवा फिल्टर करताे. त्यातील नायट्राेजन पुन्हा वातावरणात साेडताे आणि आॅक्सिजनचा रुग्णांना पुरवठा करताे. 

Web Title: Coronavirus: Shiv Sena gives "oxygen" to Konkan, 150 oxygen concentrators for Raigad, Ratnagiri Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.