coronavirus: लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या सेवेला एसटी, परतीसाठी बसेसची विशेष व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:01 AM2020-05-11T02:01:06+5:302020-05-11T02:01:43+5:30

पोलादपूर : कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आल्याने एसटी बसेससह इतर खासगी वाहतूक बंद ...

coronavirus: Special arrangements for ST, return buses for citizens stranded due to lockdown | coronavirus: लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या सेवेला एसटी, परतीसाठी बसेसची विशेष व्यवस्था

coronavirus: लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या सेवेला एसटी, परतीसाठी बसेसची विशेष व्यवस्था

googlenewsNext

पोलादपूर : कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आल्याने एसटी बसेससह इतर खासगी वाहतूक बंद होती. यामुळे तालुक्यातील अनेक गावांत बाहेरील जिल्ह्यातील नागरिक पोलादपूरमध्ये अडकले होते, त्यांच्यासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष एसटी बसेस सोडण्यातयेत आहेत.

शनिवारी दुपारी २.३० वाजता पोलादपूर येथील देवळे गावातील अडकलेल्या नागरिकांना पहिल्या बसने पनवेल येथे सोडण्यात आले. ही बस पोलादपूर स्थानकात आली असता या वेळी नायब तहसीलदार देसाई आदी कर्मचारी उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील विविध गावे-वाड्यावरून जवळपास ३३८ नागरिक बाहेरील जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये ठाणे ४१, पालघर ९, रत्नागिरी १६, सिंधुदुर्ग ११, मुंबई शहर ३९, अकोला ३४, अमरावती ३, बुलढाणा २३, यवतमाळ ६, वाशीम ९, लातूर २३, नांदेड २१, परभणी १, वर्धा २२, धुळे ४, नंदुरबार ३, अहमदनगर १, पुणे २८, सातारा ८, सोलापूर ३०, नाशिक २, पनवेल ४ प्रवासी आहेत.

मदतीसाठी संपर्क : राज्याच्या विविध भागात नोकरी, शिक्षण आदी कारणांमुळे नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. बससाठी ०२१४५-२२२१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाड आगाराने के ले आहे.

काही अटी...

प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी शासनाने विहित केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रवाशाने आपले ओळखपत्र अथवा आधारकार्ड सोबत ठेवावे.
बसच्या प्रवास मार्गाने सुरुवातीचे ठिकाण त शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी देण्यात येईल. मागार्तील मधल्या थांब्यावर थांबता येणार नाही.
च्बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करावयाचा असल्याने एका बसमध्ये जास्तीत जास्त २२ प्रवाशांस प्रवास करता येणार आहे.

Web Title: coronavirus: Special arrangements for ST, return buses for citizens stranded due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.