CoronaVirus: पोलादपूरमधील महिलेला कोरोनाची लागण; महाडमधील खाजगी रुग्णालय सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:49 AM2020-04-19T00:49:10+5:302020-04-19T00:50:46+5:30

उपचार करणारे वैद्यकीय अधिकारीही क्वारंटाइन

CoronaVirus woman in Poladpur found corona positive | CoronaVirus: पोलादपूरमधील महिलेला कोरोनाची लागण; महाडमधील खाजगी रुग्णालय सील

CoronaVirus: पोलादपूरमधील महिलेला कोरोनाची लागण; महाडमधील खाजगी रुग्णालय सील

Next

पोलादपूर : शहरातील प्रभात नगरमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तिची वैयक्तिक ट्रॅव्हल हिस्ट्री नसून सहा महिन्यांपासून ती घरातच आहे. या महिलेचा पती २२ मार्चला मुंबईहून पोलादपूरला आला होता. ८ एप्रिलला महिलेला ताप आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यावर महाडमधील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या वेळी कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महिलेच्या पतीला शनिवारी तपासणीसाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आह. तर होळीसाठी आलेला तिचा मुलगा आणि सून यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यात मुंबई, पुणे व इतर शहरांतून आल्या ५१ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी प्रभातनगर परिसर सील करण्याच्या सूचना दिल्या. या ठिकाणी नगरपंचायतीमार्फत दररोज निर्जंतुकीकरण तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

स्थलांतरित चाकरमान्यांमुळे प्रादुर्भाव?
महाड : मुंबई आणि पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेक नागरिकांनी रेल्वे रुळावरून चालत गाव गाठले आहे. जिल्हा प्रवेशबंदी असतानाही नागरिक येथे येतात कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मार्ग आणि रुग्णवाहिकेतून नागरिक येत असल्याचे समोर आले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना नागरिक गावात येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि इतर भागातून महाड तालुक्यात आजवर ११,९६७ नागरिक आले आहेत. यापैकी ९,७५२ नागरिकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे तर अद्याप २,२१५ नागरिकांचा कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. महाडमध्ये परराज्यातून ९८ नागरिक आले असून २५२ नागरिकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परदेशातून ९८ नागरिक महाडमध्ये आले आहेत.

Web Title: CoronaVirus woman in Poladpur found corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.