शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

CoronaVirus: पोलादपूरमधील महिलेला कोरोनाची लागण; महाडमधील खाजगी रुग्णालय सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:49 AM

उपचार करणारे वैद्यकीय अधिकारीही क्वारंटाइन

पोलादपूर : शहरातील प्रभात नगरमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तिची वैयक्तिक ट्रॅव्हल हिस्ट्री नसून सहा महिन्यांपासून ती घरातच आहे. या महिलेचा पती २२ मार्चला मुंबईहून पोलादपूरला आला होता. ८ एप्रिलला महिलेला ताप आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यावर महाडमधील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या वेळी कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.महिलेच्या पतीला शनिवारी तपासणीसाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आह. तर होळीसाठी आलेला तिचा मुलगा आणि सून यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यात मुंबई, पुणे व इतर शहरांतून आल्या ५१ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी प्रभातनगर परिसर सील करण्याच्या सूचना दिल्या. या ठिकाणी नगरपंचायतीमार्फत दररोज निर्जंतुकीकरण तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.स्थलांतरित चाकरमान्यांमुळे प्रादुर्भाव?महाड : मुंबई आणि पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेक नागरिकांनी रेल्वे रुळावरून चालत गाव गाठले आहे. जिल्हा प्रवेशबंदी असतानाही नागरिक येथे येतात कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मार्ग आणि रुग्णवाहिकेतून नागरिक येत असल्याचे समोर आले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना नागरिक गावात येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि इतर भागातून महाड तालुक्यात आजवर ११,९६७ नागरिक आले आहेत. यापैकी ९,७५२ नागरिकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे तर अद्याप २,२१५ नागरिकांचा कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. महाडमध्ये परराज्यातून ९८ नागरिक आले असून २५२ नागरिकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परदेशातून ९८ नागरिक महाडमध्ये आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या