Coronavirus : अमेरिकेतून आलेला तरुण निगराणी कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:12 AM2020-03-21T03:12:23+5:302020-03-21T03:13:09+5:30
अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली.
कर्जत /नेरळ : अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. आरोग्य विभागाने त्या ३६ वर्षीय तरुणाच्या हातावरील निशाण तपासून घेतले. त्यास कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नसल्याची खात्री के ली.
नेरळ गावातील तरुण नोकरीनिमित्त अमेरिकेत असतो. खांडा भागात त्याची पत्नी आणि तीन मुले राहतात. आरोग्य विभागाचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष पेठे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील, नेरळ ग्रामपंचायतचे अधिकारी, महसूल अधिकारी आणि केमिस्ट संघटनेचे आयुब तांबोळी, कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे हे सर्व तेथे पोहोचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने त्याची तपासणी केली असून त्या तरुणाला पुढील १४ दिवस निगराणी कक्षात ठेवण्यात येणार असून त्याला रुग्णवाहिकेतून वैजनाथ येथील जीवन विद्या मिशनमधील निगराणी कक्षात ठेवण्यासाठी नेण्यात आले आहे.