जंजिरा मुक्ती दिनासाठी पत्रव्यवहार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:48 AM2018-02-01T06:48:16+5:302018-02-01T06:48:31+5:30

मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे.

 The correspondence will be sent for Janjira Mukti day | जंजिरा मुक्ती दिनासाठी पत्रव्यवहार करणार

जंजिरा मुक्ती दिनासाठी पत्रव्यवहार करणार

googlenewsNext

नांदगाव/ मुरूड : मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. जंजिरा मुक्ती दिन हा शासनामार्फत साजरा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुक्ती दिन साजरा करण्यासाठी शासनाकडे जो पत्रव्यवहार करावा लागणार आहे तो मी लवकरच पुन्हा एकदा करून जास्तीत जास्त प्रयत्न करेल अभिवचन या वेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले.
मुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार पाटील बोलत होते. या वेळी कार्यक्र मात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजसेवक जाहिद फकजी व सर्पमित्र संदीप घरत या दोघांना शाल श्रीफळ,व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की, भारत देश एकसंघ राहण्यासाठी देशातील ५६५ संस्थाने विलीन होणे खूप गरजेचे होते. संरक्षण मंत्री वल्लभभाई पटेल यांनी त्या वेळी धाडसी निर्णय घेतल्यामुळेच संस्थाने भारतात विलीन झाली. जंजिरा मुक्ती दिनासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी कष्ट केले आहेत त्यांचे आज स्मरण करणे आवश्यक बाब आहे. त्यांच्या आंदोलनामुळेच जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. एक चांगला उपक्र म पत्रकार संघटनांनी केल्याबद्दल त्यांनी विशेष शब्दात कौतुक केले.
विजय मोकल यांनी सुद्धा मार्गदर्शनपर भाषण करत गोवा महामार्गातील इंदापूर ते पळस्पे हा रस्ता होण्यासाठी गेली १४ वर्षे प्रेस क्लब झगडत आहे. त्यांच्या मागणीचा विचार शासनाला करावा लागला त्याचप्रमाणे जंजिरा मुक्ती दिन हा लोकमहोत्सव होण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्र मासाठी पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आझाद मैदान चौकात ध्वजारोहण
मुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. मुरु ड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर जंजिरा नवाबाची सत्ता होती. ३१ जानेवारी १९४८ रोजी शामील नाम्यावर सही झाल्याने हे तिन्ही तालुके भारतात शामील झाले होते. ३१ जानेवारी हा दिन जंजिरा मुक्ती दिन म्हणून पत्रकार संघाच्यावतीने साजरा करण्यात येतो. या वेळी सकाळी ९ वाजता आझाद चौकात रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्र म समाप्त होताच नगरपरिषद हॉल येथे मोठ्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन साजरा
च्म्हसळा : म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसळा नं.१ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
च्म्हसळा शहरात रायगड प्रेस क्लब व म्हसळा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसºया वर्षी जंजिरा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक काते यांच्या हस्ते करण्यात आले.
च्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी जंजिरा मुक्ती दिन हा शासकीय कार्यक्र म झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर जिजामाता शिक्षण संस्था, म्हसळाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पुढील वर्षापासून जंजिरा मुक्ती दिन संस्थेत साजरा करणार असल्याचे अभिवचन उपस्थितांना संबोधित करताना दिले.
च्कार्यक्र माचे सूत्रसंचालन अंकुश गाणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुशील यादव यांनी मानले.या कार्यक्र मासाठी म्हसळा पंचायत समिती उपसभापती मधुकर गायकर, म्हसळा नगराध्यक्ष कविता बोरकर आदी उपस्थित होते.
 

Web Title:  The correspondence will be sent for Janjira Mukti day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड