शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

जंजिरा मुक्ती दिनासाठी पत्रव्यवहार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:48 AM

मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे.

नांदगाव/ मुरूड : मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. जंजिरा मुक्ती दिन हा शासनामार्फत साजरा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुक्ती दिन साजरा करण्यासाठी शासनाकडे जो पत्रव्यवहार करावा लागणार आहे तो मी लवकरच पुन्हा एकदा करून जास्तीत जास्त प्रयत्न करेल अभिवचन या वेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले.मुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार पाटील बोलत होते. या वेळी कार्यक्र मात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजसेवक जाहिद फकजी व सर्पमित्र संदीप घरत या दोघांना शाल श्रीफळ,व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की, भारत देश एकसंघ राहण्यासाठी देशातील ५६५ संस्थाने विलीन होणे खूप गरजेचे होते. संरक्षण मंत्री वल्लभभाई पटेल यांनी त्या वेळी धाडसी निर्णय घेतल्यामुळेच संस्थाने भारतात विलीन झाली. जंजिरा मुक्ती दिनासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी कष्ट केले आहेत त्यांचे आज स्मरण करणे आवश्यक बाब आहे. त्यांच्या आंदोलनामुळेच जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. एक चांगला उपक्र म पत्रकार संघटनांनी केल्याबद्दल त्यांनी विशेष शब्दात कौतुक केले.विजय मोकल यांनी सुद्धा मार्गदर्शनपर भाषण करत गोवा महामार्गातील इंदापूर ते पळस्पे हा रस्ता होण्यासाठी गेली १४ वर्षे प्रेस क्लब झगडत आहे. त्यांच्या मागणीचा विचार शासनाला करावा लागला त्याचप्रमाणे जंजिरा मुक्ती दिन हा लोकमहोत्सव होण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्र मासाठी पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे आदी मान्यवर उपस्थित होते.आझाद मैदान चौकात ध्वजारोहणमुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. मुरु ड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर जंजिरा नवाबाची सत्ता होती. ३१ जानेवारी १९४८ रोजी शामील नाम्यावर सही झाल्याने हे तिन्ही तालुके भारतात शामील झाले होते. ३१ जानेवारी हा दिन जंजिरा मुक्ती दिन म्हणून पत्रकार संघाच्यावतीने साजरा करण्यात येतो. या वेळी सकाळी ९ वाजता आझाद चौकात रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्र म समाप्त होताच नगरपरिषद हॉल येथे मोठ्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन साजराच्म्हसळा : म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसळा नं.१ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.च्म्हसळा शहरात रायगड प्रेस क्लब व म्हसळा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसºया वर्षी जंजिरा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक काते यांच्या हस्ते करण्यात आले.च्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी जंजिरा मुक्ती दिन हा शासकीय कार्यक्र म झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर जिजामाता शिक्षण संस्था, म्हसळाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पुढील वर्षापासून जंजिरा मुक्ती दिन संस्थेत साजरा करणार असल्याचे अभिवचन उपस्थितांना संबोधित करताना दिले.च्कार्यक्र माचे सूत्रसंचालन अंकुश गाणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुशील यादव यांनी मानले.या कार्यक्र मासाठी म्हसळा पंचायत समिती उपसभापती मधुकर गायकर, म्हसळा नगराध्यक्ष कविता बोरकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड