अलिबाग : गेली १०-१२ वर्षे रायगडातील राष्ट्रीय महामार्गासह, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, जिल्हा परिषद मार्ग, ग्रामपंचायतीचे रस्ते, अनेक नगरपालिकांतील रस्ते यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रसिद्धी माध्यमांनी देखील त्याबाबत वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु संबंधित अधिकारी कार्यवाही करीत नाहीत. त्यातच २०१४-१५ व २०१५-१६ या कालावधीत झालेली रस्त्याची दुर्दशा अत्यंत भयानक आहे. या रस्त्यांची निर्मिती आणि दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे यापूर्वीही लक्षात आले आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा आप पक्षाचे सदस्य दिलीप जोग यांनी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती कार्यवाहीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर, मुंबई उच्च न्यायालयाच्या जनसामान्य तक्रार निवारण कक्ष यांना पाठविल्या आहेत.२०१५-१६ मध्ये झालेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृ ष्ट दर्जाची असून त्यातील बरेच रस्ते जून २०१६ मध्ये खराब झाले आहेत, परिणामी दररोज अनेक अपघात घडत आहेत. लोक मृत्युमुखी पडत आहेत, जबर जखमी होत आहेत. प्रवाशांना स्पॉन्डिलायटिस, मणकेदुखी, सांधेदुखी, छातीत दुखणे, शारीरिक त्रास होणे, एस.टी. प्रवासी व व्यावसायिक वाहनांसह सर्वच वाहनांचे नुकसान होणे, प्रवासाला दुप्पट वेळ लागणे असे प्रकारही होत आहेत. अपंग, आजारी व्यक्ती, वृध्द, गर्भवती यांनाही यापासून दररोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. यातून डिझेल व पेट्रोलसारखे आयात करावे लागणारे इंधन, जास्त प्रमाणात खर्च होऊन त्यातूनही फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय नुकसान होत असल्याचे जोग यांनी निवेदनात नमूद केले आहे. मूळ निकषानुसार कामे न करणे, कमी व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, बांधकाम संहितेनुसार (इंडियन रोड काँग्रेस /रेडबुक ) कामे न करणे, कोणतीही शास्त्रीय तपासणी न करता साहित्य वापरणे अशा अनेक प्रकारे यात भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. या प्रकरणी पूर्वीही ३० जून २०१६ रोजी याच संदर्भाने सर्वांकडे तक्रार दाखल केलेली आहे. तिच्यावर काहीही कारवाई झालेली नसल्याचेही जोग यांनी नमूद केले आहे. (विशेष प्रतिनिधी)कार्यवाही करणाररस्त्यांना खड्डे पडले आहेत, त्यातून अपघात होत आहेत त्या अनुषंगाने आलेल्या तक्रार निवेदनानुसार चौकशी करून संबंधित यंत्रणांना त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.कामे न करणे, कोणतीही शास्त्रीय तपासणी न करता साहित्य वापरणे व वापरण्यास परवानगी देणे, काम सुरु असताना अधिकाऱ्यांनी साईटवर प्रत्यक्ष हजर न राहणे, प्रत्यक्षात रस्त्याचे कोणतेही काम न करता काम झाल्याचे दाखवून पूर्ण बिल काढणे, अशा अनेक प्रकारे यात भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रस्ते निर्मितीत भ्रष्टाचाराचा आरोप
By admin | Published: July 28, 2016 3:46 AM