न्यायालयाने धनंजयचा जामीन नाकारला; १५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:51 AM2017-11-04T03:51:37+5:302017-11-04T03:51:45+5:30
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव येथील शाखेत तीन विद्यार्थ्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलीस तपासात या बँकेचा शिपाई धनंजय आगरकर याने या विद्यार्थ्यांना हाताशी धरून बँकेत चोरी करण्यासाठी दहा हजार रु पये देऊ केल्याचे निष्पन्न झाले होते.
नांदगाव/ मुरु ड : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव येथील शाखेत तीन विद्यार्थ्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलीस तपासात या बँकेचा शिपाई धनंजय आगरकर याने या विद्यार्थ्यांना हाताशी धरून बँकेत चोरी करण्यासाठी दहा हजार रु पये देऊ केल्याचे निष्पन्न झाले होते. या तिन्ही विद्यार्थ्यांनी तसा जबाब नोंदवल्यानंतर तातडीने बँकेचा शिपाई धनंजय आगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल के ला.त्याला मुरु ड दिवाणी न्यायालयात हजर करून मुरु ड पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. परंतु मुरु ड न्यायालयाने ही मागणी फेटाळून त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत एमसीआर देऊ केला असून त्याला जिल्हा जेलमध्ये ठेवण्याचे सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी बँक चोरी प्रकरणात सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून धनंजय आगरकर यास पोलीस कस्टडी घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण पोलीस तपासात त्याने सुद्धा त्याचा गुन्हा कबूल केला आहे. सन्नी कंटक याची दोन दिवसांची पोलीस कस्टडी संपल्यावर त्याला सुद्धा मुरु ड दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्याला सुद्धा १५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे सांगितले.