शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
5
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
6
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
7
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
8
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
9
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
10
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
11
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
12
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
13
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
14
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
15
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
16
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
17
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
18
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
20
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

बोरघाटात ब्लॅक स्पॉटला संरक्षक कठड्यांचे कवच, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयआरबीकडून लगेचच कामालाही सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 1:25 PM

Borghat Black Spot: शनिवारी पहाटे बोरघाटात ढोलताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते.

 खोपोली : शनिवारी पहाटे बोरघाटात ढोलताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी बैठक होऊन सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टीने आढावा घेतला गेला व त्यानंतर लगेचच आयआरबीने त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्स बसविण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती खोपोलीचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.

बोरघाटात अंडा पॉइंट, शिंग्रोबाच्या वरच्या खिंडीपासून ते टाटा कॉलनी, सायमाळपर्यंत उतारावर अनेकदा बस, अवजड वाहने, रिक्षा पलटी होऊन अनेक माणसे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबर, जानेवारीमध्ये या ठिकाणी तीन बस पलटी झाल्या होत्या. शाळकरी मुलांच्या सहलीची बसही पलटी झाली होती. त्यामध्ये दोन विद्यार्थी दगावले होते. या प्रत्येक वेळेला व त्यापूर्वीच्या अनेक वर्षांतील शेकडो अपघातांमध्ये फक्त सुरक्षेच्या कारणांवर चर्चा होत असे. मात्र, त्यावर योग्य त्या उपाययोजनांसाठी कुठल्याही प्रकारची पावले उचलली गेली नव्हती.

धोकादायक वळणे कमी करण्यावर भरखोपोली बस दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी  घटनास्थळी भेट दिली  व त्यांचे आदेश आल्यानंतर २४ तासांच्या आत कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये काहीसे समाधान व्यक्त होत आहे. तसेच शॉर्टकट म्हणून वाहनचालक चुकीच्या पद्धतीने येतात तो रस्ताही बंद करण्यात येणार आहे. संरक्षक कठडे बसविण्याबरोबरच ज्या ठिकाणी धोकादायक वळणे कमी करता येतील त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड