उरणमध्ये गांधी जयंतीनिमित्त माकपचे उपोषण; राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान बचावाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:13 PM2023-10-02T16:13:19+5:302023-10-02T16:13:35+5:30
नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले.
- मधुकर ठाकूर
उरण : उरणमध्ये गांधी जयंतीच्या दिवशीच गांधी चौकात राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले. माकप आणि पुरोगामी व धर्मनिरपेक्ष संघटनांनी यासाठी उपोषण सोमवारी उपोषण केले.
या उपोषणाच्या दरम्यान भारताची एकता व एकात्मता आणि भारताचा गौरव कर्तव्य आणि अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी प्रतिज्ञाही म्हणण्यात आली. त्याचप्रमाणे भारताचे संविधान आणि त्याची उद्देशिकेचेही जाहीर वाचन करण्यात आले. तसेच याचा अभिमान बाळगून जनतेने सर्वधर्म समभाव व माणुसकी नात्याने देशाचा विकास करण्याचे व यातून नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपोषणात माकप,जनवादी महिला संघटना, डीआयएफआय,सीआयटीयु तसेच उरण मधील इतर संघटनानी पाठिंबा देत उपोषणात सहभाग घेतला. तर कम्युनिस्ट नेते व आदिवासीच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य बहाल करणारे कॉम्रेड कुमार शिराळकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन केले. यावेळी माकपचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, सिटु कामगार संघटनेचे भूषण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील, कुंदा पाटील, किसान सभेचे संजय ठाकूर,डीवायएफआयचे राकेश म्हात्रे आदीजण उपस्थित होते.