रायगड- अलिबाग तालुक्यातील चरी मंडळातील ताडवागळे सजे हद्दीतील मौजे बोपोली येथील वाघजाई आदिवासीवाडी पासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.
वनखात्याच्या जागेत डोंगर उतारावर ६ कुटूंब असून एकुण ३६ व्यक्ती आहेत. सदर घरे ही डोंगर व दरडी पासून अंदाजे ३०० मीटर अंतरावर आहेत. सदर डोंगराची आज सकाळी थोडी दरड पडली असून संबंधित गावातील व्यक्तींना जवळच्या वाघजाई वाडीत त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.