कागदापासून आकर्षक गणेशमूर्तीची निर्मिती; संतोष थळे यांची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:17 AM2020-08-10T00:17:54+5:302020-08-10T00:17:57+5:30

कोरोनामुळे मुंबई, पुणे येथून आलेल्या ऑर्डर रद्द झाल्याने चिंता

Creation of attractive Ganesha idols from paper; Art by Santosh Thale | कागदापासून आकर्षक गणेशमूर्तीची निर्मिती; संतोष थळे यांची कला

कागदापासून आकर्षक गणेशमूर्तीची निर्मिती; संतोष थळे यांची कला

Next

अलिबाग : गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. शासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करण्याच्या भाविकांना सूचना केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेल्या १७ वर्षांपासून कागदाच्या आकर्षक गणेशमूर्ती बनवत आहेत. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुणे येथून आलेली मागणी रद्द झाली आहेत. त्यामुळे त्यांना लाखो रु पयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

गणेशमूर्तीपूर्वी गणेशाच्या मूर्ती शाडू मातीपासून बनविल्या जात. त्यानंतर, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली. मात्र, केंद्र शासनाने प्लास्टर आॅफ पॅरिसवर बंदी आणल्याने, पुन्हा शाडूमाती आणि इतर पर्यावरणपूरक वस्तूंपासून गणेशमूर्ती बनविण्यास प्राधान्य मिळत आहे. सागाव येथील संतोष थळे यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा छंद आहे. २००३ पासून त्यांनी कागदापासून शोपीस, पपेट बनविण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना गणेशमूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली. गणपतीच्या साच्यामध्ये कागदाला खळ लावून कागद बसवून गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर, या मूर्तींना पर्यावरणपूरक जलरंग देऊन रंगरंगोटी केली जाते. कागदापासून बनविलेल्या सुबक आणि आकर्षक मूर्तींची थळे विक्र ी करतात.

या वर्षी मुंबई-पुणे येथूनही शेकडो मूर्तींची आॅर्डर थळे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी गणपतीच्या मूर्तीही बनवल्या. मात्र, कोरोना संकट असल्यामुळे थळे यांना मिळालेल्या आॅर्डर रद्द झाल्या आहेत. त्यामुळे बनविलेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा? हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला
आहे.

भाविकांना पर्याय
रायगड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कोरोनामुळे अद्याप गणेशमूर्ती पोहोचलेल्या नाहीत. या वर्षी कोरोनामुळे कमी पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. संतोष थळे यांनी कागदापासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, भाविकांकडे या मूर्तींची स्थापना करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली मात्र आॅर्डर रद्द झाल्यामुळे संतोष थळे यांनी ‘लोकमत’जवळ चिंता व्यक्त के ली.

Web Title: Creation of attractive Ganesha idols from paper; Art by Santosh Thale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.