अलिबाग : शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बनवायचे असा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा पाठींबा मिळाला. सर्वांच्या परिश्रमामुळे बाळाराम पाटील आमदार म्हणून निवडून आले. या यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांचेच आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागेत शुक्रवारी कोकण शिक्षक मतदार संघाचे नविनर्वाचित आ. बाळाराम पाटील तसेच सर्व निरीक्षकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी आ.जयंत पाटील म्हणाले, राज्यात विधीमंडळात काम करीत असताना कौटुंबिक नाते जपणारे विकास सावंत यांच्यासारखी विविध पक्षातील अनेक मंडळी भेटली. त्यांच्या सहकार्यामुळे व पाठींब्यामुळे विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणूक लढण्याची ताकद मिळाली. त्यात कार्यकर्त्यांनी देखील झोकून देऊन काम केले. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे पनवेलकरांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा विजय आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिले. त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यामुळे अधिक जिद्दीने काम करु न शेतकरी कामगार पक्षाची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर आणण्यासाठी मेहनत घ्या असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले. नवनिवार्चित आ. बाळाराम पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले,आ. जयंत पाटील, विवेक भाई यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी पाठींबा दिला. गेली ३६ वर्षे शिक्षक मतदार संघावर भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक परिषदेचा पगडा होता. त्यामुळे हे काम कठीण होते. परंतु त्यानंतर कामाला लागलो. सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर व रायगड जिल्हयात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यास सुरु वात केली. कोकणात शेतकरी कामगार पक्षाबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य संस्थांच्या असलेल्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधून प्रत्येक शाळेत जाऊन नियोजनबध्द काम केले असे आ. बाळाराम पाटील यांनी नमुद केले.यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील आदीं उपस्थित होते.
‘यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांनाच’
By admin | Published: February 14, 2017 4:57 AM