जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:20 AM2020-04-27T01:20:46+5:302020-04-27T01:20:51+5:30

रोह्यातील पहूर गावातील सरपंचासह ३९ जणांनी जेवणावळींचे आयोजन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाड पोलिसांनी ४० पैकी ३४ जणांना अटक केली आहे.

Crime against 40 diners, 34 arrested | जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत

जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत

googlenewsNext

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना रोह्यातील पहूर गावातील सरपंचासह ३९ जणांनी जेवणावळींचे आयोजन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाड पोलिसांनी ४० पैकी ३४ जणांना अटक केली आहे.
कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ एप्रिलला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पहूर गावाच्या सरपंचासह ३९ जण जेवणावळी करीत असल्याची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता एकत्रित ४० जण जमले असल्याचे निदर्शनास आले, तसेच ते तोंडाला मास्क न लावता हजर होते. कोरोना या रोगाच्या साथीचा प्रसार तसेच साथीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणीही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे, तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत, असे आदेश असताना त्याचे उल्लंघन केले.

Web Title: Crime against 40 diners, 34 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.