महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती, कंपनी प्रशासन व व्यवस्थापकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:49 AM2023-11-09T06:49:44+5:302023-11-09T06:50:11+5:30
ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत आग लागून दुर्घटना घडली होती.
महाड : ब्लू जेट हेल्थ केअर या औषधांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासन आणि देखभाल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. दुर्घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत आग लागून दुर्घटना घडली होती. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासन व देखभाल व्यवस्थापक शैलेश जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
अपघातास कारणीभूत असलेल्या यंत्रणेची सखोल चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित केली आहे. त्यात महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे हे अध्यक्ष असून, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे जी.एस. हरलय्या, कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ यांच्यासह इतर विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.