संतोष सापते
श्रीवर्धन : श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे २०२० मध्ये प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाचे श्रीवर्धनमधील गुन्हेगारी जगतातसुद्धा पडसाद उमटलेले दिसून येत आहेत. २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये गुन्ह्यांचा वाढणारा आलेख २०२० मध्ये मोठ्या स्वरूपात घसरलेला दिसत आहे. गंभीर गुन्हे, किरकोळ गुन्हे या दोन्हीपैकी गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी मारामारी, विश्वासघात, पळवून नेणे, दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, विनयभंग, प्राणांतिक अपघात व दारूबंदी या सर्वांचा तुलनात्मक विचार केल्यास सन २०२० मध्ये जवळपास सर्वच गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. सदरच्या कालावधीमध्ये सरकारी नोकरावर एकदाही हल्ला झालेला नाही, तसेच संवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या क्षेत्रात एकही दरोडा पडलेला नाही सर्वसामान्य व्यक्तीला सुरक्षा प्रदान करणे हे पोलीस दलाचे प्रथम कर्तव्य आहेत.
गुन्हेगारीचा आलेख पुढीलप्रमाणे
सन २०१९ २०२०खुनाचा प्रयत्न ०० ०१बलात्कार ०१ ०१दरोडा ०१ ००जबरी चोरी ०० ०१घरफोडी ०३ ०२चोरी ०२ ०१गर्दी मारामारी ०२ ०४विश्वासघात ०२ ०१
सन २०१९ २०२०पळवून नेणे ०२ ०१दुखापत ०५ ०८नोकरदारांवर हल्ला ०१ ००विनयभंग ०३ ०१प्राणांतिक अपघात ०३ ०१इतर ०२ ०१प्रतिबंधात्मक ०२ ०८दारूबंदी ०६ ०८
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या स्वरूपात निर्णायक भूमिका बजावली आहे.परिणामस्वरूप श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घातला गेला आहे. - प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन