पाली : ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दीड हजार गावामधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अतिवृष्टीने उभे पीक शेतात आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी, येथील शेतकºयांच्या हाता-तोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर व व्याकूळ झाला आहे.
यंदा पावसाने बºयापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पीक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरूही झाले होते. मात्र, पावसामुळे शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे शिकार होत असल्याने सरकारने आधार देणे गरजेचे आहे, असे बाळाराम काटकर या शेतकºयाने सांगितले.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला तरच आपल्या सर्वांना जगता येईल. अन्यथा भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल,अशा प्रकारे शेतकºयांना फटका बसत असल्याने मोठी चिंता वाढली आहे, असे शरद गोळे या शेतकºयाने सांगितले.दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.१ सप्टेंबर, २०१९च्या शासन निर्णयानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.तालुक्यातील भाताची रोपे पावसाने दडी मारल्याने उगवली नव्हती. त्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून कले होते. मात्र, अद्याप त्या सर्व शेतकºयांना शासनाची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या पावसाने शेतीचे झालेले नुकसानीबद्दल पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील नुकसान भरपाई मिळाली नाही. आताच्या नुकसानीची मोजदाद कधी होणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
कर्जत तालुक्यातील भाताची शेती हे तालुक्यातील अर्ध्या भागातील लोकांचे उदरनिवाहाचे साधन आहे. पावसाळी शेती करणाºया शेतकºयांना जून २०१९ मध्ये जमिनीत भाताचे रोप टाकले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकून गेली होती. त्यात शेतकºयांनी मोठी रक्कम मोजून बियाणे खरेदी केली होती. बियाणे शेतातून बाहेर पडले नाही. त्यामुळे बियाणे नव्याने खरेदी करण्याची वेळ आली होती. जुलै महिन्यात अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहून आजूबाजूच्या शेतात गेली होती. त्यामुळे देखील भाताच्या रोपांचे नुकसान झाले होते. त्या बद्दल शासनाने दिलेल्या आदेशाने कर्जत तालुक्यातील तब्बल १,३०० शेतकºयांचे पंचनामे केले गेले. त्यावेळी सर्व शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई केली जाईल, असे वाटले होते. त्याच्यानंतर आता सुरू असलेल्या सरत्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून सरत्या पावसाने आपली उपस्थिती लावल्याने भाताचे पीक खराब झाले आहे. भाताचे पीक काही ठिकाणी शेतात कापून ठेवले आहे तर काही ठिकाणी ते उभे असून सुकल्याने काळपट पडू लागले आहे. तर काही ठिकाणी शेतात कोसळलेले भाताचे पीक शेतात पावसाचे पाणी असल्याने जमिनीवर कुजून जात आहे.