अलिबाग - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. भाताचे व्यावसायिक उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभाग व सर्व बँकांनी प्रयत्न करून, यंदाच्या खरीप हंगामाकरिता ठेवण्यात आलेले २०३ कोटींचे खरीप पीक कर्ज वितरणाचा लक्षांक साध्य करावा अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय बैठकीत केल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षाला पुरेल इतक्याच भाताचे उत्पादन घेण्याच्या मानसिकतेचे आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण शेतक-यांपैकी ७१ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यामुळे भातशेतीकरिता कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यात २०१९ च्या खरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर गतवेळच्या ४० हजार रुपये वरून वाढवून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमीन धारणेनुसार शेतकºयांची संख्या एकूण ३ लाख ११ हजार ६४८ आहे. त्यातील सर्वाधिक ७१ टक्के म्हणजे २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत. १५ टक्के म्हणजे ४८ हजार २३९ शेतकरी अल्प भूधारक म्हणजे १ ते २ हेक्टर जमीनधारक आहेत. केवळ १३ टक्के म्हणजे ४१ हजार ८२२ शेतकरी हे सर्वसाधारण म्हणजे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारक आहेत.जवळपास २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी हे अत्यल्प भूधारक असून या शेतकºयांकडे एकूण भूक्षेत्रापैकी २४ टक्के क्षेत्र आहे. परिणामी भातपिकासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जे शेतकरी भात पीक विक्रीकरिता घेतात त्याच शेतकºयांना पीक कर्ज घेणे परवडत असल्याने या बैठकीत सांगण्यात आले.यंदा दीड लाख शेतकरी घेणार कर्जाचा लाभयंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शेतकरी पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामात किमान दीड लाख शेतकरी पीक कर्जाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पुढाकार घेऊन पीक कर्ज लक्षांक साध्य होईल याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना डॉ.सूर्यवंशी यांनी केल्या.शेतक-यांच्या पारंपरिक मानसिकतेचा भातपिकाच्या उत्पादनावर परिणामजमीनधारणेनुसार, जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार ६४८ शेतकरीखरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर ४० हजारांवरून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी
पीक कर्जात यंदा २०३ कोटींचे उद्दिष्ट, खरीप हंगामात भातपीक वृद्धीवर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:31 AM