१०४ कोटी ३६ लाखांचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:16 AM2017-08-04T02:16:31+5:302017-08-04T02:16:31+5:30
खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ८९७ खातेदारांना १०४ कोटी ३६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटप अधिकाधिक शेतकºयांना झाले पाहिजे, त्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले आहेत.
शेतकरी खरीप पीक कर्ज, पीक विमा तसेच कर्जमाफी योजनेअंतर्गत द्यावयाचे १० हजार रु पयांचे अंतरिम कर्ज यांचा जिल्ह्यातील वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बँकांच्या विशेष समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हाधिकाºयांनी बैठकीत बँकनिहाय आढावा घेतला. कर्जमाफी योजनेत द्यावयाचे १० हजार रु पयांच्या वितरणाबाबत तसेच पीक विमा यासंदर्भात आढावा घेतला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत द्यावयाच्या कर्ज वितरण प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सामाजिक साहाय्य योजनांमधील लाभार्थी, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत मजूर यांची बँक खाती प्राधान्याने आधार संलग्नित करावी अशी सूचनाही यावेळी दिली.
बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रामदास बघे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रेमलता जैतू, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक प्रदीप नाईक, बँक आॅफ महाराष्ट्र व्यवस्थापक ए.एस. पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक आर.बी.नलावडे, विविध बँकांचे अधिकार आणि शाखाप्रमुख उपस्थित होते.