कार्लेखिंड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: August 31, 2016 03:23 AM2016-08-31T03:23:01+5:302016-08-31T03:23:01+5:30
आठवडाभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच गौरीही घरोघरी बसणार आहेत. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवासाठी करावयाची आरास
सुनील बुरुमकर, कार्लेखिंड
आठवडाभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच गौरीही घरोघरी बसणार आहेत. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवासाठी करावयाची आरास यासाठी लागणारे विविध सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी पाहावयास मिळत आहे, तर गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठीही महिलांची लगबग सुरू आहे. ओवसा हा महत्त्वाचा असून यासाठी लागणाऱ्या सुपांची आवक वाढली आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उत्सव मानला जातो व त्याप्रमाणे साजरा केला जातो. पहिल्यांदा शाडू मातीच्या गणपर्तीमूर्ती बनविण्यात येत होत्या. परंतु सध्याच्या काळात मजुरी आणि शाडूची माती महाग झाल्यामुळे गणेश मूर्तिकार प्लॅस्टर आॅफ पॅरिसकडे वळले. चालू घडामोडीतील चित्रीकरण या मूर्तींमधून साकारताना दिसत आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे आकार मोठे झाले आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या मूर्ती आकाराने मोठ्या असल्या तरी वजनाने हलक्या असतात. सध्या गणपती कारखान्यांतून मोठ्या गणेशमूर्तींची मागणी होताना दिसत आहे. यामध्ये साठ-सत्तर टक्के वाढ झाली आहे. ओवशामुळे बाजारात सूप बनविणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या तेजीचे दिवस आहेत. वर्षभरात सुपांची विक्री कमी होत असते. परंतु या ओवसा सणामुळे सुपाला मागणी वाढली आहे. सुपांची किंमत एकशे पंचवीसपासून दीडशे-अडीचशे एवढी आहे. (वार्ताहर)