सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:03 AM2020-03-21T03:03:09+5:302020-03-21T03:03:49+5:30
कोरोना विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत.
पाली : संपूर्ण जगाला भयभीत करणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातील नागरिकांना बाधित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व सरकारी यंत्रणा तसेच काही सामाजिक संघटनादेखील या विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत. सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी नागरिकांनी कामासाठी गर्दी के ली होती.
शासनाचे महसूल गोळा करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय येथे रोज घरांचे, शेतजमिनीचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयात मात्र गर्दी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरदेखील रोज १० ते १५ दस्त नोंदविले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यालयांमध्ये
मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण,
पनेवल, डोंबिवली येथील अनेक नागरिक रोज दस्त नोंदणीसाठी येत आहेत.
त्याचप्रमाणे दस्त नोंदणीसाठी देणार-घेणार, दुय्यम निबंधक यांचा अंगठा तसेच ओळख देणाºया व्यक्तींची बायोमेट्रिक नोंद म्हणजे अंगठा प्रमाणित करावा लागतो. त्यामुळे जर एखादा कोरोनाबाधित व्यक्ती येथे आला तर या अंगठा प्रमाणीकरणामुळे कोरोना संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे.
तसेच या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची सावधानता तसेच सॅनिटायझरची व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर कार्यवाही करून हे कार्यालय काही दिवसांसाठी बंद करणे गरजेचे आहे.