पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:17 AM2018-12-26T04:17:06+5:302018-12-26T04:17:54+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. भरीस भर म्हणून वीकेण्ड आणि नाताळ सणानिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे तब्बल दीड लाख जादा वाहने जिल्ह्यात दाखल झाली होती.
आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांमुळे जिल्ह्यात मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. परंतु जिल्हा वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे यंदा कुठेही फारशी कोंडी न झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांकडे धाव घेतली होती. पर्यटक खासगी वाहने घेऊन येत आहेत. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत तब्बल दीड लाख वाहने रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे रायगडातील पर्यटन स्थळे फुलून गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी सुमारे २७ टक्क्यांनी अधिक आहे.
आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड जिल्हा औद्योगिकीकरणासाठीही ओळखला जात असल्याने अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत, त्यातच काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो.
पाच दिवसांत ६७७ जणांवर कारवाई
गेल्या पाच दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºया ६७७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये तब्बल लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नाताळातील पर्यटनाचा हंगाम संपला की लगेचच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी होणाºया वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
२९, ३०, ३१ डिसेंबर २०१८ आणि १ जानेवारी २०१९ अशा चार दिवस पोलिसांना सलग काम करावे लागणार असल्याने पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरणार आहे.
वाहतुकीवरील ताण वाढणार हे गृहीत धरूनच नियोजन करण्यात आले होते. वाहतूक विभागाचे ७६ कर्मचारी थंडी, वाºयाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रित करीत होते. वाहतुकीमध्ये कोणताच अडथळा येऊ नये यासाठी चार फेज करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जिते-पेण- वडखळ या हेवी ट्रॅफिकच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुसरा फेज लोणरे ते माणगाव असा आहे. श्रीवर्धनहून पुण्याकडे जाणाºया वाहनांना हा फेज सोयीस्कर असा करण्यात आला आहे. तिसरा फेज खोपोली-शिळफाटा- पाली-वाकण आणि चौथा फेज हा अलिबाग-मुरुड असा होता. त्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या मोबाइल बाइक तैनात होत्या.
- सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक विभाग