शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:22 AM2020-06-10T00:22:45+5:302020-06-10T00:23:56+5:30

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी

Crowds in the markets to buy materials due to the acceleration of agricultural work | शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

Next

अलिबाग : सुरुवातीला कोरोनाचे सावट आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने दिलेला तडाखा असे दुहेरी संकट रायगडवर ओढवले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील नागरिक स्थिरस्थावर होण्यासाठी अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील नागरिक पावसापासून रक्षण करण्यासाठी कामाला लागले आहेत. घराच्या डागडूजी बरोबरच शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.मान्सून अगदी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागल्याने मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतांमध्ये वर्दळ पाहायला मिळत आहे.

एकीकडे मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात टाळेबंदी झाल्याने सर्वत्र शांतता होती. सरकारने खरीपपूर्व शेतीकामांना शिथिलता दिल्यानंतर पेरणीपूर्व नांगरणी, सपाटी अशी कामे सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने मजूर ही भेटणे अशक्य झाले होते. बाजारपेठेत शेतीच्या अवजारास बियाणांच्या खरेदीला गेल्यावर एकाच ठिकाणी वस्तू मिळाली नसल्याने शेतकºयांची ससेहोलपट झाली होती. मागील बुधवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतीकामाची गती मंदावली होती. मात्र, आता मंगळावारपासून पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत.
जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून खरीपाच्या तोंडावर पीककर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकºयाला मोठा आधार होणार आहे. त्यातच वादळामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकºयांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. आज सर्व उद्योग अडगळीत असताना शेती उद्योग सुरू आहे. मात्र अचानक निसर्ग वादळाच्या फटक्याने शेतकरी राजाचे खच्चीकरण झाले आहे.
एकीकडे पडझड झालेल्या घरांची डागडूजी करण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे खर्च करावे लागत आहे. येणाºया पावसापासून आपला व आपल्या घरांचा बचाव करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी मेणकापड, ताडपत्री खेरीदी करताना दिसत आहेत. काहींनी हात उसणे पैसे घेऊन बी-बीयाण्यांची खरेदी केली असून निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना मंगळवार पासून मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.

मान्सून दाखल झाल्यावर फळझाड लागवडीला वेग
दरवर्षी मान्सून येण्यापूर्वी शेतकरी फळबाग लागवडीसाठी नियोजन करायचे.मात्र वादळामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे. नर्सरी तसेच विविध रोपवाटिकांमध्ये अद्यापही कलम व रोप तेथेच पडून आहेत. चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत या रोपांची व कलमांची विक्र ीही रखडलेली आहे. त्यामुळे याचा फटका रोपवाटिका विक्रेत्यांनाही बसलेला आहे. विविध प्रकारची कलमे व रोपे चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत आली असून ती परिपक्व होऊन विक्र ीच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून दाखल झाल्यानंतर फळझाड लागवडीसाठी वेग येणार असल्याचे रोपवाटिका विक्र ेत्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Crowds in the markets to buy materials due to the acceleration of agricultural work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.