सलग सुट्ट्यांमुळे दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:24 PM2020-12-26T23:24:16+5:302020-12-26T23:24:26+5:30

आठवड्यापूर्वीच बुकिंग फुल्ल; समुद्रकिनाऱ्यावर वाहनांच्या रांगा

Crowds of tourists in Diveagar, Harihareshwar, Shrivardhan due to consecutive holidays | सलग सुट्ट्यांमुळे दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहरात पर्यटकांची गर्दी

सलग सुट्ट्यांमुळे दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहरात पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

श्रीवर्धन : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अलोट गर्दी झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून पर्यटकांनी श्रीवर्धन शहरात गर्दी करण्यात सुरुवात केली. 

पुणे- मुंबईव्यतिरिक्त नाशिक, अहमदनगर, बीड व लातूर येथील पर्यटकांनी श्रीवर्धन तालुक्याला पसंती दिली. श्रीवर्धन शहरातील सर्व हॉटेल व लॉजिंग एक आठवडा अगोदर आरक्षित आहेत. रायगड जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या पर्यटकांना पर्यटनासोबत स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आवडत आहे. बोंबील, सुकट, सोडे व मासळी यांची मागणी पर्यटक करत आहेत. खासगी वाहनांच्या रांगा समुद्रकिनाऱ्यावर व हॉटेलच्या बाहेर लागलेल्या दिसून येत आहेत. 

Web Title: Crowds of tourists in Diveagar, Harihareshwar, Shrivardhan due to consecutive holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड