जेएसडब्ल्यू कंपनीने केले सीआरझेडचे उल्लंघन; तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:06 PM2019-12-30T23:06:32+5:302019-12-30T23:06:38+5:30
बांधकामे पाडून टाकण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अलिबाग : तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर ५०-‘ड’ या सरकारी कांदळवनाच्या जागेमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने सीआरझेडचे उल्लंघन करुन बेकायदा वनेत्तर कामे केली आहेत. कंपनीने प्रकल्पाच्या विस्तारा करीता केलेला मातीचा भराव, संरक्षक भिंत, कनव्हेअर बेल्टसाठी सिमेंट काँक्रि टचे फाउंडेशन अशी अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासीत करावीत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहाबाज ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर आत नव्याने तक्रार दाखल झाल्याने जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी जिल्हाधिकाºयांकडे याबाबतची लेखी तक्र ार केली आहे. कांदळवनांची कत्तल केल्याप्रकरणी या आधीच सावंत यांनी जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात कोकण विभाग आयुक्तांकडे तक्र ार दाखल करण्यात आली आहे.
आता सीआरझेड कायद्याचा भंग कंपनीकडून केला गेला असल्याचे विविध सरकारी विभागांच्या अहवालामधूनच स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे तसा अहवालच जिल्हाधिकाºयांकडे असल्याने या प्रकरणी पुन्हा तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित करावेत अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी जिल्हाधिकाºयांना लिहिलेल्या पत्रामध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने प्रकल्प विस्तारकरीता शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर ५०-‘ड’ मधील सुमारे पाच एकर या कांदळवनयुक्त जमिनीची मागणी रायगड जिल्हाधिकाºयांकडे ७ जुलै २०११ रोजी केली असल्याचे उपलब्ध कागदपत्राच्या आधारे दिसून येते. यातील गंभीर बाब म्हणजे कंपनीने मागणी केलेली जमीन सीआरझेड १ व इकोलॉजिकल सेन्सेटिव्ह क्षेत्रामध्ये येत असल्याचे सहायक संचालक नगररचना अलिबाग यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.
तसेच याच जमिनीमध्ये कंपनीने मातीचा भराव २८ जानेवारी २०१० पूर्वी केला आहे. तर संरक्षक भिंत ६ नोव्हेंबर २०११ रोजी बांधली आहे. तसेच कनव्हेअर बेल्टसाठी सिमेंट काँक्रि टचे फाऊंडेशनचे काम १ आॅक्टोबर २०१७ ते ४ एप्रिल २०१८ या कालावधीत पूर्ण केले आहे.
कंपनीने अशी कामे केली असल्याचा स्पष्ट अहवालच उपवनसंरक्षक विभागाने जिल्हाधिकाºयांना २५ सप्टेंबर २०१८ आणि १३ नोव्हेंबर २०१९ रोजी दिला आहे.
बेकायदा कामे
या अहवालामध्ये ही बेकायदा कामे जेएसडब्ल्यू कंपनीने केली असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
त्यामुळे कंपनी विरोधात सीआरझेड कायद्याच्या उल्लंघनाबाबत गुन्हे दाखल करण्याची, कंपनीची बांधकामे पाडून टाकण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.