कोएसोचा दहावीचा निकाल ८९.३६ टक्के

By admin | Published: June 14, 2017 03:11 AM2017-06-14T03:11:07+5:302017-06-14T03:11:07+5:30

कोकणातील अग्रगण्य कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ८९.३६ टक्के लागला आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ४६ तर इंग्रजी माध्यमाच्या ५ अशा एकूण ५१ शाळा आहेत.

CSEO results of Class X results of 89.66 percent | कोएसोचा दहावीचा निकाल ८९.३६ टक्के

कोएसोचा दहावीचा निकाल ८९.३६ टक्के

Next

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

कोकणातील अग्रगण्य कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ८९.३६ टक्के लागला आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ४६ तर इंग्रजी माध्यमाच्या ५ अशा एकूण ५१ शाळा आहेत. त्यापैकी चार शाळांचा निकाल १०० टक्के, २३ शाळांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक, २४ शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक, ५ शाळांचा निकाल ७० टक्केपेक्षा अधिक तर ४ शाळांचा निकाल ६० टक्केपेक्षा अधिक लागला आहे.
१०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये संस्थेच्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील कोएसो माध्यमिक शाळा,घारापुरी शाळेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसोली-कुडाळ येथील को.ए.सो. यशवंत राघोजी परब विद्यालय, कोएसो शाळा,घोसाळे, कोएसो वीणा पंडित तेंडुलकर इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा,रोहा या चार शाळांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दहावी परीक्षेत पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी भरारी घेतली आहे.
पी.एन.पी. होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी, जीजेएम इंग्लिश मिडीयम स्कूल खालापूर, पी.एन.पी. मराठी माध्यम शाळा वेश्वी, माध्यमिक शाळा चौल, माध्यमिक शाळा वडघर पांगळोली, माध्यमिक शाळा जांबरु ग, माध्यमिक शाळा पाष्टी, माध्यमिक शाळा सुतारपाडा या आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमध्ये पी.एन.पी. मराठी माध्यम शाळा वेश्वी, या शाळेची विद्यार्थिनी मानसी राजेश म्हात्रे ९०.२० टक्के गुण संपादन करून संस्थेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.उर्वरित शाळेचे निकाल ९० टक्केच्या वर लागले असून पी.एन.पी. संस्थेचा निकाल ९० टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्रशासन अधिकारी अमित देशपांडे यांनी अभिनंदन केले.
कुरुळ येथील सुधागड एज्यु.माध्यमिक शाळेचा निकाल ८२.७५ टक्के लागला असून राहुल प्रकाश पाटील हा ८० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. साक्षी अजय दास (७८.४०टक्के) दुसरी, परेश प्रमोद घरत (७७.८०टक्के) तिसरा, हेमरु सुधाकर घाडगे (७६.६०) चौथा तर उषाकुमारी शंभूप्रसाद मेहता (७५.८०टक्के) हिने शाळेत पाचवा क्रमांक पटकावला असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता प्रसाद पाटील यांनी दिली. शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. अ‍ॅड.दत्ता खानविलकर एज्युकेशन ट्रस्ट संचालित चिंतामणराव केळकर विद्यालयाचा यंदा सलग पाचव्या वर्षी देखील १०० टक्के निकाल लागला आहे. मराठी माध्यमात चिन्मयी जुईकर ९४.६० टक्के गुण मिळवून तर इंग्रजी माध्यमात अदिती सचिन पाटील ९४.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आले आहेत. शाळेतील ७० पैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ३८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक तर दोन विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अमर वार्डे यांनी दिली आहे.
महाड येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाड तालुक्यातील दाभोळ माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर संस्थेच्या महाडमधील आदर्श विद्यालयाचा निकाल ८१ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली. या दोन्ही शाळेतील विद्यार्थी बाहेरील शिकवणी वर्गात जात नाहीत. शाळेच्या शिक्षकांच्या माध्यमातूनच सर्व विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास करून घेतला जातो, असे अ‍ॅड.काळे यांनी सांगितले.

Web Title: CSEO results of Class X results of 89.66 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.